बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. हेच नाही तर ऐश्वर्या राय ही बाॅलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या रायने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या रायने अभिनय आणि जाहिरातींमधून कोट्यवधी संपत्ती कमावली आहे. ऐश्वर्या राय ही कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये घटस्फोट होणार असल्याची तूफान चर्चा आहे.
नुकताच ऐश्वर्या राय ही स्पाॅट झालीये. ऐश्वर्या राय हिच्या हाताला दुखापत झाली आहे. विमानतळावर ऐश्वर्या राय दिसली. विशेष म्हणजे यावेळी ऐश्वर्या राय हिच्यासोबत आराध्या बच्चन देखील होती. ऐश्वर्या राय हिच्या हाताला दुखापत नेमकी कशाने झाली, हे अजून कळू शकले नाहीये. मात्र, आईची काळजी घेताना आराध्या बच्चन दिसली आहे.
ऐश्वर्या राय ही आपल्या हातामधील बॅग सुरक्षारक्षकाला देत असतानाच आराध्या आईच्या हातामधील बॅग घेताना दिसत आहे. यासोबतच आई ऐश्वर्या राय हिला गप्पा मारताना आराध्या दिसत आहे. हेच नाही तर पापाराझी यांच्याकडे पाहून स्माईल देतानाही आराध्या बच्चन दिसली. आराध्या बच्चन हिचे हे वागणे लोकांना प्रचंड आवडल्याचे देखील दिसत आहे.
लोक आराध्या बच्चन हिचे काैतुक करताना दिसत आहेत. अनेकांनी थेट म्हटले की, ऐश्वर्या राय हिने मुलाला खूप चांगले संस्कार दिले आहेत. ऐश्वर्या राय ही पापाराझी यांना बाय करताना दिसली. ऐश्वर्या रायने आराध्याला देखील पापाराझी यांना बाय करण्यास सांगितले. लोकांना ऐश्वर्या राय आणि आराध्या यांचे हे वागणे आवडले आहे.
आता काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय हिचा हात बघितल्यानंतर चाहते ऐश्वर्या राय हिला काळजी घेण्याचा सल्ला देताना देखील दिसत आहेत. ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला. यानिमित्ताने अत्यंत खास पोस्ट ऐश्वर्याने सोशल मीडियावर शेअर केली होती.