सोनाक्षी सिन्हा हिने ‘ते’ फोटो शेअर करताच भडकले लोक, म्हणाले, अल्लाह…
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे सात वर्ष डेट केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे नाव कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे सोनाक्षीचे चित्रपट कायमच धमाका करताना दिसतात. सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक नक्कीच आहे. सोनाक्षी सिन्हा हिने तब्बल सात वर्ष डेट केल्यानंतर झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. सुरूवातीला यावरून सोनाक्षी सिन्हा हिला खडेबोल सुनावले जात होते. सलमान खान याच्या घरी पहिल्यांदा झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांची भेट झाली. विशेष म्हणजे पहिल्याच भेटीमध्ये दोघे अनेक तास गप्पा मारत बसले होते. सोनाक्षी सिन्हा ही लग्नाच्या अगोदरही झहीर इक्बाल याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसत.
सोनाक्षी सिन्हा हिने गपणपती बाप्पाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे यावेळी सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत झहीर इक्बाल हा देखील दिसतोय. झहीर आणि सोनाक्षी आरती करताना दिसत आहेत. पोस्ट शेअर करत अत्यंत खास असे कॅप्शन सोनाक्षी सिन्हा हिने सोशल मीडियावर शेअर केले. सोनाक्षी सिन्हा हिच्या या पोस्टवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
सोनाक्षी सिन्हा हिच्या फोटोवर कमेंट करत एकाने लिहिले की, अल्लाह यांना हिदायत दे. दुसऱ्याने लिहिले की, अरे वा म्हणजे आता सोनाक्षी सिन्हा ही रोजा देखील ठेवणार. तिसऱ्याने लिहिले की, भाभी आता रोजा पण ठेवावा लागणार. सोनाक्षी सिन्हा हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा जबरदस्त असा लूक दिसत आहे.
View this post on Instagram
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी अगोदर सिव्हील मॅरेज केले. विशेष म्हणजे लग्नासाठी सही सोनाक्षी सिन्हा करत असताना तिने आपल्या वडिलांचा हात पडकल्याचे बघायला मिळाले. लग्नानंतर मुंबईमध्ये अत्यंत खास पार्टीचे आयोजन सोनाक्षी सिन्हा आणि झहीर यांच्याकडून करण्यात आले. या पार्टीला अनेक मोठे बॉलिवूड कलाकार देखील सहभागी झाले.
सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाच्या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले. हनी सिंह याच्या गाण्यावर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल डान्स करताना दिसले. विशेष म्हणजे लग्नानंतर सतत हनिमूनवर जाताना देखील सोनाक्षी सिन्हा ही दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर सक्रिय असून सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्नाबद्दल मोठा खुलासा केला होता.