Ajmer 92 | अखेर ‘अजमेर 92’ चित्रपटाचा टीझर रिलीज, 250 हिंदू मुलींसोबत…, निर्मात्यांच्या दाव्यानंतर खळबळ
अजमेर 92 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच आता या चित्रपटाचा टीझर हा रिलीज झालाय. या चित्रपटाच्या टिझरवरून बऱ्यापैकी स्टोरीचा अंदाजा हा नक्कीच येतो. आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी देखील मोठा दावा केला आहे.
मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अजमेर 92 (Ajmer 92) चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झालाय. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची प्रतिक्षा केली जातंय. विशेष म्हणजे अजमेर 92 हा चित्रपट 21 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाची स्टोरी ही अजमेर शहराशी संबंधित आहे. अजमेर 92 या चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंह (Pushpendra Singh) आहेत. उमेश कुमार तिवारी आणि करण वर्मा यांनी मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 1992 च्या अजमेर गँगरेप प्रकरणावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये काही मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे. टीझरमधून (Teaser) बऱ्याच गोष्टी पुढे येताना दिसत आहेत.
या टिझरमध्ये मुलींवर बलात्कार झाल्याचे दाखवले गेले असून मुलींनी आत्महत्या केल्याचे देखील दिसत आहे. अजमेर दर्ग्याच्या काही चिस्ती सेवकांनी 200 ते 250 हिंदू मुलींवर बलात्कार केला असा दावा या चित्रपटात करण्यात आलाय. या बलात्काराच्या घटनेनंतर अनेक मुलींनी आपली जीवन यात्रा संपवत थेट आत्महत्येचे पाऊल देखील उचलले.
आता द केरळ स्टोरीनंतर या चित्रपटातून देखील काही मोठे खुलासे होऊ शकतात, असा दावा केला जातोय. मुळात म्हणजे अजमेर 92 चित्रपटाच्या टीझरची सुरूवात ही एका फोन काॅलने झाल्याचे दिसत आहे. एका मुलीच्या घरी फोन येतो मग पुढे दुसऱ्या एका मुलीच्या घरी देखील फोन येतो. विशेष म्हणजे यांना या फोनवरून धमकी दिली जात असल्याचे दिसत आहे. त्यांचे काही आक्षेपार्ह फोटो हे पेपरमध्ये प्रसिद्ध करू, असे सांगून त्यांना धमकावले जात आहे.
देश के सबसे बड़े सेक्स कांड पर बनी फिल्म “Ajmer 92” का ट्रेलर रिलीज।
अजमेर दरगाह के कुछ चिस्ती ख़ादिमो द्वारा 200-250 हिंदू बच्चियों का किया गया था रेप।
कई लड़कियों ने कर ली थी आत्महत्या।
कुछ बलात्कारी मुख्य ख़ादिमो के नाम :
मोहम्मद फारूक चिस्ती (प्रेसिडेंट ऑफ़ अजमेर यूथ… pic.twitter.com/lIFFmQPzPX
— Panchjanya (@epanchjanya) July 14, 2023
या धमक्यांमुळे एकही मुलगी ही बलात्कारा विरोधात पोलिसांमध्ये तक्रार देण्यास नाही जात असे दाखवले आहे. शेवटी कंटाळून या मुली एका मागून एक आत्महत्या करताना दिसत आहेत. मुलींच्या आत्महत्येमुळे तेथील सरकार आणि पोलिस प्रशासन हादरल्याचे दिसत आहे. अजमेर 92 या चित्रपटाचे टीझर अंगावर काटा आणणारे नक्कीच आहे.
या टीझरमध्ये पुढे दाखवण्यात आले आहे की, अजमेरमध्ये 250 बलात्कार पीडित मुलींनी आत्महत्येचे पाऊस उचलले. टिझरमध्ये हे देखील दाखवण्यात आले की, बलात्कार पीडित मुलींना सतत धमक्या मिळत होत्या. सर्वात धक्कादायक म्हणजे चित्रपट निर्मात्यांनी असा दावा केला आहे की, अजमेर 92 चित्रपटाची स्टोरी ही सर्व सत्य घटनांवर आधारित आहे. यामुळेच मोठी खळबळ उडालीये.