बॉलिवूड सेलिब्रिटी फक्त लग्न नाही तर, अंत्यसंस्काराला जाण्यासाठी घेतात मोठी रक्कम, कशी होते कमाई?
Bollywood Celebrity | बॉलिवूड सेलिब्रीटी कोणाच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी देखील मोठी रक्कम, मोठं सत्य अखेर समोर, अभिनेत्याचा 'हा' व्हिडीओ पाहून व्हाल हैराण... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बॉलिवूड सेलिब्रिटींच्या कमाईची चर्चा...
बॉलिवूड सेलिब्रिटी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीची सिनेमा मोठ्या पडद्यावर कधी प्रदर्शित होणार आणि आपल्याला त्याला पाहता येणार… याच प्रतीक्षेत चाहते असतात. सेलिब्रिटी एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतात. वर्षाला 1 – 2 सिनेमे केल्यानंतर देखील सेलिब्रिटींचं घर चालत नाही. ज्यामुळे सेलिब्रिटी इतर मार्गांनी देखील पैसे कमावण्याचा प्रयत्न करत असतात.
जाहिराती, प्रमोनश इत्यादी मार्गांनी सेलिब्रिटी कोट्यवधी रुपयांची माया कमावतात. ज्यामुळे सेलिब्रिटी रॉयल आयुष्य जगत असतात. महत्त्वाचं म्हणजे, कोणाच्या लग्नाला जाण्यासाठी देखील सेलिब्रिटी कोट्यवधी रुपये घेतात. उद्योजकांच्या लग्नात सेलिब्रिटी हजेरी लावताता, ज्यासाठी सेलिब्रिटींसाठी कोट्यवधी रुपये दिले जातात.
सांगायचं झालं तर, लग्न कार्यांमध्ये उपस्थित राहण्यासाठी सेलिब्रिटी पैसे घेतात. पण जर सेलिब्रिटी डान्स किंवा गाणं गाणार असतील तर, त्यासाठी देखील बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी मोठी रक्कम घेतात. सेलिब्रिटींच्या डान्सचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.
सेलिब्रिटी फक्त लग्नांमध्ये नाही तर, अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी देखील पैसे घेतात. बॉलिवूडचं हे सिक्रेट फार कमी लोकांना माहिती आहे. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेता अनुज याने बॉलिवूड सेलिब्रिटींच्या कमाईचं मोठं रहस्य उघड केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अभिनेता म्हणाला, ‘जे प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटी असतात ते लग्नांच्या माध्यमातून देखील कमाई करतात. डान्स करतात ज्यासाठी त्यांना मोठी रक्कम मिळते. एवढंच नाहीत, अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी देखील सेलिब्रिटी मोठी रक्कम आकारतात… हे देखील त्यांच्या कमाईचं एक माध्यम आहे..’ असं देखील अभिनेता म्हणाला…
अभिनेत्याच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ नेटकरी कमेंट करत स्वतःची प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘हे सत्य आहे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘प्रचंड मोठं रहस्य आहे…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘अनेकांना याबद्दल काहीही माहिती नाही…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सेलिब्रिटींच्या कमाईची चर्चा रंगली आहे…