Bollywood : ‘या’ सेलिब्रिटींचे होते विवाहबाह्य संबंध; एका अभिनेत्याने गर्लफ्रेंडला लग्नाचं वचन दिलं आणि…
Bollywood : 'या' सेलिब्रिटींच्या विवाहबाह्य संबंधांमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ... प्रसिद्ध अभिनेत्याचं प्रेम प्रकरण बाहेर आल्यानंतर चाहत्यांनी व्यक्त केला संताप...जाणून तुम्हालाही बसेल धक्का...
मुंबई | 2 7 ऑगस्ट 2023 : बॉलीवूड इंडस्ट्रीत प्रेम, लग्न आणि घटस्फोट ही आता एक सामान्य गोष्ट झाली आहे. सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी त्यांच्या दोन लग्नांमुळे आणि अफेअर्समुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात राहतात. बॉलीवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत ज्यांनी कुटुंबाच्या विराधात जावून लव्ह मॅरेज केल. पण लग्नानंतरही त्यांचे स्वतःच्या को-स्टारसोबत अफेअरच्या चर्चांमुळे खळबळ माजली. अफेअरमुळे या कलाकारांची पत्नीसोबत थाटलेल्या संसाराची देखील पर्वा केली नाही. आज जाणून घेऊया अशा कलाकारांबद्दल ज्यांचं लग्न झाल्यानंतरही विवाहबाह्य संबंध होते.
अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा | शिल्पासाठी अक्षय याने रवीन टंडन हिच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. शिल्पा हिला अनेक वर्ष डेट केल्यानंतर देखील दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. शिल्पा हिच्यासोबत देखील ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्याने ट्विंकल खन्ना हिच्यासोबत लग्न केलं.
लग्नानंतर देखील अभिनेत्याचं नाव अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम देखील केलं. पण जेव्हा दोघांच्या नात्याची चर्चा ट्विंकल खन्नपर्यंत पोहोचली तेव्हा अक्षयच्या पत्नीने त्याला प्रियांका हिच्यासोबत काम न करण्याचा सल्ला दिला.
अभिनेता शाहरुख आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा | दोघांच्या नावाची देखील तुफान चर्चा रंगली. बॉलिवूडमध्ये नाही तर चाहत्यांपर्यंत किंग खान याचे प्रियांका हिच्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याच्या चर्चांनी जोर धरला. शाहरुख खान याच्यासोबत प्रियांका हिच्या नात्याची चर्चा रंगू लागली तेव्हा मात्र बॉलिवूडमध्ये सर्वत्र खळबळ माजली. अशात ट्विंकल हिच्याप्रमाणे गौरीने देखील शाहरुख खान याला प्रियांका हिच्यासोबत काम करण्यास बंदी केली.
हृतिक रोशन आणि कंगना रनौत | हृतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट झाला आहे. दोघांच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री देखील झाली आहे. पण कंगना रनौत हिच्यामुळे अभिनेत्याने पहिल्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.. असं देखील अनेकदा सांगण्यात आलं. एवढंच नाही तर, हृतिक यांने कंगनाला घटस्फोटानंतर लग्नाचं देखील वचन दिलं होतं. पण दोघांचं लग्न होवू शकलं नाही.
महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा | दोघे त्यांच्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. पण आज देखील दोघांच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असते. अमिताभ विवाहित असताना देखील रेखा यांच्यावर बिग बी यांचा जीव जडला होता. एकदा जया यांनी रेखा यांना स्वतःच्या घरी बोलावलं आणि पती अमिताभ बच्चन यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिलं. तेव्हा रेखा आणि बिग बी विभक्त झाले.