AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood Corona | मनोरंजन विश्वात कोरोनाची दहशत, बॉलिवूडचे आणखी दोन मोठे कलाकार कोरोनाच्या विळख्यात!

कोरोना विषाणूचा कहर देशभरात सतत वाढतच चालला आहे. दिवसेंदिवस हे प्रकरण अधिक गंभीर बनत चालले आहे. गेल्या आठवड्यापासून बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स कोरोना संसर्ग झाला आहे.

Bollywood Corona | मनोरंजन विश्वात कोरोनाची दहशत, बॉलिवूडचे आणखी दोन मोठे कलाकार कोरोनाच्या विळख्यात!
तारा सुतारिया आणि आशिष विद्यार्थी
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 3:43 PM

मुंबई : कोरोना विषाणूचा कहर देशभरात सतत वाढतच चालला आहे. दिवसेंदिवस हे प्रकरण अधिक गंभीर बनत चालले आहे. गेल्या आठवड्यापासून बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स कोरोना संसर्ग झाला आहे. अभिनेता रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, निर्माते संजय लीला भन्साळी, आणि आता अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेते आशिष विद्यार्थी यांचादेखील या यादीत समावेश झाला आहे. तारा आणि आशिष विद्यार्थी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे (Bollywood Celebrities Tara Sutariya and  Ashish Vidyarthi tested corona positive).

‘तडप’च्या सेटवर ताराला कोरोनाची लागण!

फिल्मफेअरच्या वृत्तानुसार, तारा सुतारियाला कोरोना संसर्ग झाला आहे. नुकताच ताराने तिच्या आगामी ‘तडप’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात तारासमवेत अहान शेट्टी महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट 24 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याच दरम्यान तिला कोरोनाची लागण झाल्याचे कळते आहे.

‘तडप’एक प्रेमकथा आहे. ताराने आपल्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून या चित्रपटाविषयी माहिती दिली. अभिनेता सुनील शेट्टी याचा मुलगा अहान शेट्टी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अक्षय कुमारनेही चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन तारा आणि अहानचे अभिनंदन केले.

आशिष विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह!

पडद्यावर आपल्या नकारात्मक भूमिकेने चाहत्यांना मुग्ध करणाऱ्या आशिष यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली आहे. आशिष यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. अभिनेते आशिष विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर दिल्लीच्या साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. अभिनेत्याने इंस्टाग्रामवर याबाबतची माहिती देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तर, माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी देखील स्वतःची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे (Bollywood Celebrities Tara Sutariya and  Ashish Vidyarthi tested corona positive).

पाहा आशिष यांचा व्हिडीओ :

(Bollywood Celebrities Tara Sutariya and  Ashish Vidyarthi tested corona positive)

इतकेच नाही तर अभिनेत्याने पुढे असेही म्हटले आहे की, मला हे संक्रमण कसे झाले हे माहित नाही. मी वाराणसीत, मुंबईत, दिल्लीत शूट करत होतो. मी सावध असायचो पण तरीही हे घडलं! म्हणूनच आपण सर्वांनी देखील आता खूप सावधगिरी बाळगली पाहिजे.

कोण आहेत आशिष विद्यार्थी?

आशिष विद्यार्थी यांनी हिंदी व्यतिरिक्त कन्नड, मल्याळम, तेलगू, बंगाली, इंग्रजी, तामिळ, ओडिया यासह अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. चित्रपटांमधील नकारात्मक भूमिकांसाठी ते खूप लोकप्रिय आहे. ‘द्रोहकाल’ चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

(Bollywood Celebrities Tara Sutariya and  Ashish Vidyarthi tested corona positive)

हेही वाचा :

Kangana Ranaut | कंगनाच्या अडचणी आणखी वाढणार! मुंबई पोलिसांनी दाखल केला नवा एफआयआर

Radhe | ‘एक बार जो मैने कमिटमेंट कर दी…’ म्हणत भाईजान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा ‘राधे’चे धमाकेदार पोस्टर…

20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.