लग्नाची तयारी नाही, शाही लग्नाचा थाट नाही…, ‘या’ अभिनेत्रींनी का घेतला झटपट लग्नाचा निर्णय?
Actress Marriage Life : चाहत्यांना होती 'या' सेलिब्रिटींच्या लग्नाची प्रतीक्षा... पण 'या' अभिनेत्रींनी कोणतीही तयारी न करता केलं झटपट लग्न? आज त्यांच्या आयुष्यात सेलिब्रिटी आनंदी तर आहेत पण...; सध्या सर्वत्र बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या खासगी आयुष्याची चर्चा...
मुंबई | 21 नोव्हेंबर 2023 : लग्न म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात. लग्नासाठी फक्त नवीन कपल नाही तर, त्यांच्या कुटुंबामध्ये देखील उत्साहाचं वातावरण असतं. लग्न घरात मोठ्या जोरात आणि थाटात लग्नाची तयारी सुरु असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्याची नवीन सुरुवात होणार असल्यामुळे, ती सुरुवात थाटात व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण काही जोडप्यांना असं करता येत नाही. त्यांना झटपट लग्न करावं लागतं.. असंच काही बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल देखील झालं आहे. गडगंज संपत्ती असताना बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींनी झटपट लग्न कारावं लागलं.
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी देखील झटपट लग्न केलं. लग्नाआधी रणबीर – आलिया यांनी तब्बल पाच वर्ष एकमेकांना डेट केलं. दोघांच्या नात्याच्या चर्चा देखील सर्वत्र तुफान रंगल्या होत्या. चाहत्यांना त्यांच्या लग्नाची देखील प्रतीक्षा होती. पण रणबीर – आलिया यांनी झटपट लग्न केलं.
आलिया लग्नाआधी प्रग्नेंट असल्यामुळे अभिनेत्रीने कमी पाहुण्यामध्ये लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर लगेच आलिया हिने सोनोग्राफीचा फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दोघे आई – बाबा झाले. आलिया – रणबीर यांच्या लेकीचं नाव राहा कपूर असं आहे.
अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी यांनी देखील झटपट लग्न केलं. 10 मे 2018 मध्ये गुपचूप दिल्लीतील एका गुरुद्वारेमध्ये गुपचूप लग्न केलं. रिपोर्टनुसार, लग्नाआधी अभिनेत्री गरोदर राहिल्यामुळे दोघांनी लवकर लग्न करण्यचा निर्णय घेतला. तेव्हा दोघांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली होती.
अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील फहाद अहमद सोबत गुपचूप आणि झटपट लग्न केलं. दोघांच्या लग्नानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. 16 फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न केल्यानंतर स्वरा हिने 6 जून 2023 गरोदर असल्याचं सांगितलं. स्वरा हिने देखील लग्नाआधी गरोदर राहिल्यामुळे लग्न केलं.
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या लग्नाआधी गरोदर राहिल्या. त्यानंतर अभिनेत्रींनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण झगमगत्या विश्वात अशा काही अभिनेत्री देखील आहेत, ज्यांनी लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतला. आज अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत. पण प्रेग्नेंसीची घोषणा केल्यानंतर अभिनेत्रींना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला.