Bollywood | पैशांपुढे दुश्मनी फेल…; पैसा – प्रसिद्धीसाठी ‘या’ सेलिब्रिटींनी उचललं मोठं पाऊल

Bollywood | एकेकाळी एकमेकांचं तोंड देखील पाहत नव्हते बॉलिवूडचे प्रसिद्ध सेलिब्रिटी.. पैसा - प्रसिद्धीसाठी बॉलिवूडचे 'हे' सेलिब्रिटी आमने - सामने तर आले, पण..

Bollywood | पैशांपुढे दुश्मनी फेल...; पैसा - प्रसिद्धीसाठी 'या' सेलिब्रिटींनी उचललं मोठं पाऊल
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 9:30 AM

मुंबई : 12 सप्टेंबर 2023 | झगमगत्या विश्वाचं आकर्षण प्रत्येकाला असतं. सेलिब्रिटींचं रॉयल आयुष्य, महागड्या वस्तू, रिलेशनशिप इत्यादी गोष्टींमुळे सेलिब्रिटी कायम चर्चेत असतात. पण बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्यामध्ये वाद आहेत. तर अनेक सेलिब्रिटी असे देखील आहेत, ज्यांच्यामध्ये ब्रेकअपनंतर दुश्मनी वाढली. ब्रेकअपनंतर काही सेलिब्रिटी एकमेकांसमोर देखील आले नाहीत. पण अनेक वर्षांनंतर सेलिब्रिटींनी आमने सामने येण्याचा मोठा निर्णय घेतला. ज्यामुळे तुफान चर्चा रंगली. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले.. तगडं मानधन आणि प्रसिद्धीसाठी बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींनी दुश्मनी विसरत सिनेमांमध्ये एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला.. अशाच सेलिब्रिटींबद्दल आज जाणून घेवू…

अभिनेता शाहिद कपूर – अभिनेत्री करीना कपूर | एक काळ असा होता जेव्हा दोघे त्यांच्या नात्यामुळे चर्चेत होते. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ‘उडता पंजाब’ सिनेमाच्या माध्यमातून दोघे अनेक वर्षांनंतर एकत्र आले.

अभिनेता रणबीर कपूर – अभिनेत्री कतरिना कैफ | दोघांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. पण अनेक वर्ष डेट केल्यानंतर रणबीर – कतरीना यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अखेर दोघे ‘जग्गा जासूस’ सिनेमामुळे एकत्र आले.

अभिनेता अक्षय कुमार – अभिनेत्री रवीना टंडन | एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये रवीना – अक्षय यांच्या नात्याची चर्चा होती. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आता दोघे ‘वेलकम ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.

अभिनेता सलमान खान – अभिनेत्री कतरिना कैफ | सलमान खान याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण कतरीना सोबत भाईजानच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण ब्रेकअपनंतर देखील सलमान – कतरिना ‘टायगर ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.

अभिनेता सजंय दत्त – अभिनेत्री माधुरी दीक्षित | सजंय दत्त – माधुरी दीक्षित यांच्या नात्याच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. पण अनेक वर्षांनंतर दोघे ‘कलंक’ सिनेमासाठी एकत्र आले.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.