करोडपती असलेल्या मलायका अरोराने भाड्याने दिला आलिशान फ्लॅट, एका महिन्याचा किराया ऐकून बसेल धक्का, तब्बल..
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. हेच नाही तर मलायका अरोरा तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. आज मलायका अरोरा ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे.
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मलायका अरोराने एक मोठा काळ बॉलिवूडमध्ये नक्कीच गाजवलाय. मलायका अरोरा ही आज मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती अर्जुन कपूर याला डेट करताना दिसत आहे. मलायका अरोरा कायमच सोशल मीडियावर अर्जुन कपूरसोबतचे फोटो शेअर करते. हेच नाही तर मलायका आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष्य देते. मलायका अरोरा सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
मलायका अरोरा ही फक्त फॅशनमधूनच नाही तर जाहिरातीमधूनही तगडी कमाई करते. नुकताच मलायका अरोरा हिने मुंबईच्या अत्यंत महागड्या परिसरातील तिचा फ्लॅट किरायाने दिलाय. महिन्याला लाखोंच्या घरात तिला किराया मिळणार आहे. मुंबईच्या पाली हिल परिसरात तिच्या मालकीचा फ्लॅट आहे. आता तोच फ्लॅट मलायका अरोरा हिने भाड्याने दिलाय.
मलायका अरोरा हिने कॉस्ट्यूम डिझायनर कशिश हंस हिला आपला फ्लॅट भाड्याने दिला. हेच नाही तर तीन वर्षांसाठी मलायकाने तिचा हा फ्लॅट दिलाय. रिपोर्टनुसार, या फ्लॅटचा एक महिन्याचे भाडे पहिल्या एक वर्षाचा महिन्याला 1.5 लाख आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षात पाच टक्क्याने किरायामध्ये वाढ होणार आहे.
म्हणजेच दुसऱ्या वर्षात महिन्याला 1.57 लाख भाडे होणार. तिसऱ्या वर्षात महिन्याला 1.65 लाख भाडे असणार. हेच नाही तर कशिश हंस हिने डिपॉझिट म्हणून मलायका अरोराला 4.5 लाख रूपये दिले आहेत. अर्जुन कपूर याने बांद्रा वेस्टमधील फ्लॅट 16 कोटीला विकला तर मलायकाने अॅरियट बिल्डिंगमध्ये नवीन फ्लॅट खरेदी केला.
मलायका अरोरा हिचे फक्त पाली हिलच नाही तर मुंबईतील अनेक भागांमध्ये फ्लॅट असल्याचे सांगितले जाते. मलायकाचा पाली हिलमधील फ्लॅट अत्यंत आलिशान असल्याचे देखील काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. मलायका अरोरा ही काही दिवसांपूर्वीच एक्स पती अरबाज खान याच्या घरी मुलगा अरहान खान याच्यासोबत पोहचली होती, यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल देखील झाले.