त्या प्रश्नाचं अखेर उत्तर मिळालं… ईशा अंबानीच्या लग्नात अमिताभ, आमिर खान वाढपी का बनले?; काय आहे उत्तर?
Ambani Family | अंबानींच्या कोणत्याही कार्यक्रमात जमते सेलिब्रिटींची गर्दी, तर ईशा अंबानी यांच्या अमिताभ बच्चन यांच्यापासून आमिर खान का झाले होते वाढपी? चर्चा रंगल्यानंतर अभिषेक बच्चन म्हणाला...
मुंबई | 2 मार्च 2024 : देशाचे सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहेत. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नामुळे सर्वत्र अनेक चर्चा रंगल्या आहे. अंबानी कुटुंबात सध्या अनंत यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. 1 ते 3 मार्च पर्यंत अनंत आणि राधिका यांच्या प्रा-वेडिंग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर 12 जुलै रोजी दोघांचं लग्न होणार आहे. प्रा-वेडिंग कार्यक्रमांसाठी अनेक बॉलिवूड कलाकार जामगनर याठिकाणी पोहोचले आहे.
तर, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांच्या लग्नासाठी बॉलिवूडकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. एवढंच नाहीतर, बॉलिवूड सेलिब्रिटी पाहुण्यांना जेवण वाढण्याचं देखील काम करत होते. ईशा यांच्या लग्नाचे देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अंबानी यांच्या लेकीच्या लग्नात पाहुण्यांना जेवण पाहून बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तर खुद्द अभिषेक बच्चन याने यामागचं कारण सांगितलं होतं. अभिषेक म्हणाला होता, ‘ही एक परंपरा आहे. ज्याला सज्जन घोट असं म्हणतात.
या परंपरेत वधूपक्षातील पाहुणे वरपक्षातील पाहु्ण्यांना जेवण वाढतात.’ अभिषेक याने स्पष्टीकरण दिल्यानंतर रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम लावण्यात आला. ईशा अंबानी यांचं लग्न उद्योजक आनंद पीरामल यांच्यासोबत 2018 मध्ये झालं होतं.
ईशा अंबानी यांच्या लग्नात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, आमिर खान, शाहरुख खान यांसारखे अनेक दिग्गज कलाकार पाहुण्यांना जेवण वाढताना दिसले. ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांना जुळी मुलं आहे.
अनंत – राधिका यांचं लग्न
मिळालेल्या माहितीनुसार, अनंत आणि राधिका यांची प्री-वेडिंग सेरेमनी 1 मार्च ते 3 मार्च या कालावधीत गुजरातमधील जामनगर येथे होणार आहे. प्री-वेडिंग सेरेमनीसाठी अनेक सेलिब्रिटी जामनगर येथे पोहोचले आहेत. 12 जुलै रोजी मुंबईत दोघेही लग्न करणार आहेत. प्रसिद्ध उद्योजक एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चेंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचं लग्न अंबानी कुटुंबातील लहान मुलगा अनंत अंबानी यंच्यासोबत होणार आहे.