‘चंद्रयान 3’चे लँडिंग पाहण्यासाठी बाॅलिवूड कलाकार उत्सुक, परेश रावल ते आयुष्मान खुरानापर्यंत कलाकारांनी दिल्या प्रतिक्रिया

चंद्रयान 3 च्या लँडिंगबद्दल संपूर्ण देशात मोठा उत्साह हा बघायला मिळत आहे. बाॅलिवूड कलाकारांमध्ये देखील या चंद्रयान 3 च्या लँडिंगबद्दल मोठा उत्साह हा बघायला मिळत आहेत. अनेक कलाकारांनी हे स्पष्ट केले आहे की, आत थेट प्रक्षेपण कुटुंबियांसोबत बघणार आहेत.

'चंद्रयान 3'चे लँडिंग पाहण्यासाठी बाॅलिवूड कलाकार उत्सुक, परेश रावल ते आयुष्मान खुरानापर्यंत कलाकारांनी दिल्या प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 4:36 PM

मुंबई : चंद्रयान 3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग (Chandrayan 3 Landing) आता अवघ्या काही तासात होणार आहे. याकडे सर्वांच्या नजरा या लागल्या आहेत. संपूर्ण देश चंद्रयान 3 च्या यशासाठी प्रार्थना करताना दिसत आहे. आता यावर बाॅलिवूडच्या (Bollywood) कलाकारांनी देखील प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केलीये. चंद्रयान 3 लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यास सर्वचजण उत्सुक आहेत. आज भारतीयांसाठी हा दिवस खरोखरच खूप मोठा आणि आनंदाचा नक्कीच आहे. एक भारतीय म्हणून प्रत्येकाला याचा अभिमान वाटत आहे. आयुष्मान खुराना याच्यापासून ते क्रिती सनॉनपर्यंत अनेकांनी यावर प्रतिक्रिय दिल्या आहेत.

चंद्रयान 3 मोहिमेबद्दल बोलताना अभिनेते परेश रावल हे म्हणाले आहेत की, चंद्रयान 3 चे लँडिंग भारतासाठी ऐतिहासिक आणि गौरवास्पद गोष्ट आहे. ही खरोखरच भारतीयांसाठी आनंदाची बाब असल्याचे देखील परेश रावल यांनी म्हटले आहे. पुढे परेश रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील यासाठी अभिनंदन हे केले आहे.

विशेष म्हणजे भारताने हे जगाला दाखवून दिले की, अत्यंत कमी खर्चात कशाप्रकारे यश मिळवले जाते. चंद्रयान 3 बद्दल बोलताना अभिनेत्री क्रिती सनॉन ही म्हणाली की, चंद्रयान 3 चे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. संध्याकाळी मी माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत बसून हे थेट प्रक्षेपण बघणार आहे. मला त्या क्षणांचा साक्षीदार व्हायचे आहे.

पुढे क्रिती सनॉन म्हणाली, मी सतत गुगलवर चंद्रयान 3 बद्दलचे सर्व अपडेट सतत चेक करते. मुळात म्हणजे आपला देश प्रत्येक गोष्टींमध्ये पुढे आहे. मग ते क्रिडा, विज्ञान असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र आपण नंबर 1 आहोतच. चंद्रयान 3 साठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा असल्याचे म्हणताना देखील क्रिती सनॉन ही दिसली आहे.

चंद्रयान 3 च्या मोहिमेबद्दल बोलताना बाॅलिवूड अभिनेता आयुष्यान खुराना हा देखील दिसला आहे. आयुष्मान खुराना हा म्हणाला की, एक भारतीय म्हणून नक्कीच मला खूप जास्त अभिमान हा वाटत आहे. भारतीय असल्याने यापेक्षा मोठा आनंद कोणताही असू शकत नाही. चंद्रयानच्या शेवटच्या 25 मिनिटांचा प्रवास खूप रंजक असणार आहे असेही आयुष्मान खुराना म्हणाला.

दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.