तुरुंगात अभिनेत्याने स्वतःला संपवण्याचा केला प्रयत्न, वडिलांचं निधन तर, आई गंभीर आजाराच्या विळख्यात
Bollywood : अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी अभिनेत्याला भोगावी लागली शिक्षा, तुरुंगात असताना अभिनेत्यावर आली अनेक संकटं..., सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या आयुष्यात आलेल्या संकटांची चर्चा... अनेक दिवसांनंतर अभिनेता व्यक्त झालाच...
मुंबई : 27 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी काही कारणांमुळे तुरुंगात जावं लागलं. पण सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगत आहे, त्या अभिनेत्यावर अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचे आरोप करण्यात आले. अभिनेता पर्ल व्ही पुरी याला अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती. २०२१ मध्ये अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अभिनेत्याला अनेक दिवस तुरुंगात मुक्काम करावा लागला होता. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्यासोबत घडलेल्या सर्व घटनांचा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पर्ल व्ही पुरी याची चर्चा रंगली आहे.
पर्ल व्ही पुरी याने त्याच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांचा खुलासा केला आहे. अभिनेता म्हणाला, ‘मी अनेक संकटांचा सामना केला आहे. माझ्यावर खोटे आरोप करुन मला फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला.’ एवढंच नाही तर, अभिनेत्याने त्याच्या तुरुंगातील दिवसांबद्दल देखील मोठा खुलासा केला.
पर्ल व्ही पुरी म्हणाला, ‘तुरुंगातील प्रत्येक दिवस मला माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस वाटत होता. तुरुंगात असताना ११ व्या दिवशी माझ्या हातात पेन होता. सिनेमांमध्ये मी पाहिलं होतं, एका पेनच्या मदतीने आपण स्वतःला संपवू शकतो. वडिलांचं निधन झालं होतं. आई आजारी होती. तिची काय अवस्था असेल तेव्हा… मला काही कळत नव्हतं मी काय करत आहे. तुरुंगात मी १०८ वेळा हनुमान चालीसाचं पठण केलं….’
२०२१ मध्ये अभिनेता तब्बल १३ दिवस तुरुंगात होता. तुरुंगात आलेल्या अनुभवाबद्दल अभिनेता म्हणाला, ‘जिवनात लोकांना ओळखण्याची महिती असली पाहिजे…’ तुरुंगात असताना अभिनेत्याच्या आजीचं निधन झालं. लगेच काही महिन्यांनंतर अभिनेत्याच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. आई कर्करोगाच्या विळख्यात अडकली…
पर्ल व्ही पुरी याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सध्या ‘यारियां २’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. सिनेमात अभिनेत्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अभिनेत्याने छोट्या पडद्याच्या माध्यमातून करियरला सुरुवात केली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पर्ल व्ही पुरी याची चर्चा रंगलेली आहे.