Game of Life : काम नाही, पैसा नाही, कुटुंबही नाही; अत्यंत खडतर आयुष्य जगते सलमान खान याची ‘ही’ अभिनेत्री

Game of Life : एकेकाळी 'या' अभिनेत्रीच्या मागे होती अनेकांची लाईन... आज कुटुंबही नाही सोबत; अत्यंत खडतर आहे सलमान खानच्या अभिनेत्रीचं आयुष्य... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वाईट दिवसांची चर्चा... जाणून घ्या काय म्हणाली अभिनेत्री?

Game of Life : काम नाही, पैसा नाही, कुटुंबही नाही; अत्यंत खडतर आयुष्य जगते सलमान खान याची 'ही' अभिनेत्री
Follow us
| Updated on: Oct 22, 2023 | 4:53 PM

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : अभिनेता सलमान खान याने अनेकांना बॉलिवूडमध्ये संधी दिली. भाईजान याने दिलेल्या संधीचं काही कलाकारांनी सोनं केलं, तर काहींना मात्र नशिबाची साथ मिळाली नाही. पण सलमान खान कधी कोणाची साथ सोडली नाही. आनंदाच्या क्षणी सलमान खान येणार नाही, पण कोणी संकटात असेल तर, अभिनेता मदत करण्यासाठी मागे-पुढे पाहाणार नाही… असं अनेक सेलिब्रिटी सलमान खान याच्याबद्दल बोलले आहे. काही वर्षांपूर्वी सलमान खान याने एका अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये संधी दिली. एका रात्रीत अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. पण अभिनेत्रीच्या आयुष्यात लोकप्रियता आणि प्रसिद्धी फार काळ टिकली नाही.

सलमान खान याच्यासोबत काम करणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री पूजा डडवाल आहे. वयाच्या १७ व्या वर्षी पूजा हिला सिनेमांमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. पण अभिनेत्रीचा ‘वीरगती’ सिनेमाकडे चाहत्यांनी पाठ फिरवली. पूजा हिने फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर, छोट्या पडद्यावर देखील अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. पण अभिनेत्रीला यश मिळालं नाही…

झगमगत्या विश्वात सतत मिळत असलेल्या अपयशामुळे तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींना तिच्या गंभीर आजाराबद्दल कळलं, तेव्हा पतीसोबत अन्य मंडळींनी देखील तिच्यासोबत असलेले सर्व संबंध तोडले. तेव्हा अभिनेत्रीची प्रकृती फार गंभीर होती.

एका सरकारी रुग्णालयात अभिनेत्रीवर उपचार सुरु होते. तेव्हा सलमान खान याच्यासोबत अन्य दोघांनी पूजा हिचा काळजी घेतली. एवढंच नाही तर, सलमान याने ६ महिने अभिनेत्रीच्या सर्व खर्चाची जबाबदारी घेतली. एवढंच नाही कर, अभिनत्रीच्या घरी फळं देखील सलमान खान पाठवायचा.

आयुष्यात आलेल्या अनेत खडतर प्रसंगानंतर अभिनेत्रीने डब्बा बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. पूजा म्हणाली, ‘मला कोणाच्याही उपकाराची गरज नाही. मी स्वतःचं काम स्वतः करू शकते… इंडस्ट्रीमध्ये अनेक लोकांना भेटत आहे. ज्यांच्याकडून कामं मिळण्याची मला अपेक्षा आहे.’ सध्या सर्वत्र पूजा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

पूजा हिने पुन्हा अनेक वर्षांनंतर इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पूजा हिच्या सारखंच अनेक अभिनेत्रींनी खासगी आयुष्यात चढ – उतारांचा सामना केला आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.