Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पुरुष तुमचा ऑप्शन म्हणून वापर करत असतील तर…’, रिलेशनशिपबद्दल अभिनेत्रीचा महिलांना मोठा सल्ला

Relationship Advice : पुरुषांच्या आयुष्यात अनेक महिला असतील तर, पत्नीने काय करावं? बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री तरुण मुली आणि महिलांना दिला मोठा सल्ला..., सध्या सर्वत्र अभिनेत्रीने तरुण मुली आणि महिलांना दिलेल्या सल्ल्याची चर्चा...

'पुरुष तुमचा ऑप्शन म्हणून वापर करत असतील तर...', रिलेशनशिपबद्दल अभिनेत्रीचा महिलांना मोठा सल्ला
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 10:42 AM

मुंबई | 12 डिसेंबर 2023 : प्रेमात अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो… आपला पार्टनर आपल्याला फसवत आहे की नाही… याचा अंदाज अनेकदा येत नाही.. आपण समोरच्या व्यक्तीवर प्रेम करत असल्यामुळे फसवणूक, डबल डेट… यांसारख्या मोठ्या गोष्टींचा विचार अनेक जण करत नाही. पण सत्य फार काळ लपून राहात नाही आणि आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करत आहोत, तो सुद्धा आपल्यावर प्रेम करतो का? असा प्रश्न मनात निर्माण होतो. एवढंच नाही तर, समोरचा व्यक्त आपल्याला फक्त ऑप्शन म्हणून वागणूक देत असेल तर, काय करावं… याचा खुलासा बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांनी केला आहे..

सोशल मीडियावर झीनत अमान तरुणींना रिलेशनशिपबद्दल सल्ला दिला आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त झीनत यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, झीनत यांनी दिलेला सल्ला फक्त मुली नाही तर, मुलांसाठी देखील फायद्याचा ठरु शकतो..

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये झीनत म्हणाल्या, ‘जर तुमच्यासोबत असेलला व्यक्ती तुमचा फक्त ऑप्शन म्हणून वापर करत असेल आणि त्याच्याकडे अनेक तुमच्यासारखे ऑप्शन असतील, तर तुम्ही त्याच्याकडे असलेले ऑप्शन कमी करु शकता. त्याच्या आयुष्यात असलेल्या ऑप्शनच्या यादीतून तुम्ही स्वतः बाजूला व्हा…’ असा सल्ला त्यांनी तरुणींना दिला…

पुढे झीनत अमान म्हणाल्या, ‘तुम्हाला ऑप्शन म्हणून पाहाणाऱ्या पार्ट टाईम लोकांना तुमच्या आयुष्यात फूल टाईम पोझिशन कधीही देऊ नका. अशा लोकांना स्वतः पासून दूर ठेवा…’ हा महत्त्वाचा सल्ला झीनत यांनी तरुणांना दिला आहे. याचा अर्थ, ज्यांच्या आयुष्यात तुमचं महत्त्व नाही, अशा लोकांना तुम्ही देखील अधिक महत्त्व देऊ नका…

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये झीनत अमान गाडीत बसलेल्या दोन मुलींना रिलेशनशिपचा सल्ला देताना दिसत आहेत. झीनत अमान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी 70 आणि 80 च्या दशकात एकापेक्षा एक सिनेमांमध्ये काम करत रुपरी पडदा गाजवला. आज झीनत अमान बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत राहातात. त्यांच्या चाहत्यांची संख्या आज देखील फार मोठी आहे.

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.