एकाच वेळी अनेक पुरुषांना डेट करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, ‘तरुण वयात असल्यामुळे मी…’

Bollywood Actress on Polyamory Relationships: 'तरुण वयात असल्यामुळे मी...', मल्टीपल रिलेशनशिप बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, तिने लग्नाआधी स्वीकारलं मातृत्व... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

एकाच वेळी अनेक पुरुषांना डेट करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, 'तरुण वयात असल्यामुळे मी...'
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 10:12 AM

बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं नातं कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. एवढंच नाही तर, काही सेलिब्रिटी एकाच वेळी अनेकांना देखील डेट करत असतात. आता मुलाखतीत एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केला आहे. मल्टीपल रिलेशनशिपबद्दल अभिनेत्री मोठा खुलासा केला आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री कल्की केक्ला आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, कल्की हिने पॉलिएमरी रिलेशनशिपबद्दल स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. शिवाय एकाच वेळी अनेक पुरुषांना डेट केल्याची कबुली देखील अभिनेत्रीने दिली आहे. आता कल्की तिच्या खासगी आयुष्यात आनंदी असली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

काय आहे है ‘पॉलीएमरस रिलेशनशिप’?

Polyamory हा ग्रीक आणि लॅटिन भाषेतील दोन शब्दांपासून बनलेला आहे. पॉली म्हणजे अनेक किंवा एकापेक्षा जास्त आणि एमरस म्हणजे प्रेम. याचा अर्थ तुम्ही एकाच वेळी अनेकांना डेट करू शकता. याला मल्टीपल रिलेशनशिप असं देखील म्हणतात.

नात्यात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता असावी ही पॉलिमरीची सर्वात मोठी आणि आवश्यक अट आहे. या नात्यात सामील असलेला प्रत्येक जोडीदार एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतो आणि सर्वांच्या संमतीनंतरच नात्यात प्रगती होते.

मल्टीपल रिलेशनशिपबद्दल कल्की म्हणाली, ‘माझं आता लग्न झालं आहे. आता या सर्व गोष्टी करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. मी भूतकाळात मल्टीपल रिलेशनशिपमध्ये होती. तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वात वेगळा काळ होता… तेव्हा मी तरुण वयात होती. पण आता मी माझ्या आयुष्यात मल्टीपल रिलेशनशिपमध्ये नाही राहू शकत…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

कल्की केक्लाचं पहिलं लग्न

कल्की हिचं पहिलं लग्न दिग्दर्शत अनुराक कश्यप याच्यासोबत झालं होतं. सिनेमाच्या सेटवर दोघांची मैत्री झाली आणि कालांतराने मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 30 एप्रिल 2011 मध्ये कल्की आणि अनुराग यांनी लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 13 नोव्हेंबर 2013 रोजी दोघांनी एक स्टेटमेंच जारी करून विभक्त होण्याची घोषणा केली. काही दिवसांनी दोघांचा घटस्फोट झाला.

लग्नाआधी कल्कीने दिला लेकीला जन्म

कल्कीने सप्टेंबर 2019 मध्ये तिच्या गरोदरपणाची घोषणा करत सर्वांना आश्चर्यचकित केले. कल्की तिचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. पण दोघांनी लग्न केले नाही. अभिनेत्रीने 7 फेब्रुवारी 2020 रोजी एका मुलीला जन्म दिला.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.