‘तिने आधी मिठी मारली त्यानंतर कान…’, प्रसिद्ध गायकाची 40 वर्षीय महिलेने काढली छेड

Bollywood famous singer : सर्वांसमोर बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाची ४० वर्षीय महिलेने काढली छेड, घडलेली घटना सांगत गायक म्हणाला, 'हेच जर मी केलं असतं तर...?', गायकाच्या वक्तव्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण...

'तिने आधी मिठी मारली त्यानंतर कान...', प्रसिद्ध गायकाची 40 वर्षीय महिलेने काढली छेड
Follow us
| Updated on: Oct 31, 2023 | 1:40 PM

मुंबई : 31 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडचा प्रसिद्ध पंजाबी गायक हार्डी संधू सध्या तुफान चर्चेत आला आहे. गायकाची इंडिया टूर पुढच्या महिन्यापासून सुरु होणार आहे. पण त्याआधी संधू यांने त्याच्या खासगी आयुष्यात घडलेल्या एका मोठ्या घटनेचा खुलासा केला आहे. एका कार्यक्रमात जवळपास ४० वर्षीय महिलेने गायकाची छेड काढली होती. संबंधीत घटना घडली तेव्हा संधू लाईव्ह कार्यक्रम करत होता. कार्यक्रम सुरु असताना, महिला स्टेजवर आली आणि पुढे जे काही घडलं… त्यावर संधू याने मोठा खुलासा केला आहे. शिवाय ‘हेच जर मी केलं असतं तर…?’ असा प्रश्न देखील गायकाने उपस्थित केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हार्डी संधू याची चर्चा रंगत आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत गायक म्हणाला, ‘एका विवाह सोहळ्यात मी परफॉर्म करण्यासाठी गेलो होतो. परफॉर्मेंस सुरु असताना जवळपास ४० वर्षांची महिला आली आणि तिने माझी छेड काढली… ती सतत स्टेजवर येण्यासाठी मझ्याकडे विनंती करत होती. पण मी नकार देत होतो. कारण एकाला बोलावल्यावर सर्वांना वाईट वाटेल…’

‘तरी देखील ती महिला ऐकत नव्हती… अखेर मी तिला बोलावलं आणि ती आली. स्टेजवर आल्यानंतर तिने मला डान्स करण्यासाठी विनंती केली.. मी तिच्यासोबत डान्स देखील केला. त्यानंतर महिलेला मला मिठी मारायची होती… तिने मला मिठी देखील मारली.. पण नंतर ती माझा कान चाटू लागली… आता हेच जर मी केलं असतं तर, परिस्थिती कशी असती?’ असं देखील हार्डी संधू म्हणाला…

हे सुद्धा वाचा

एका तरुणाने गायकावर फेकली होती बाटली…

मुलाखतीत हार्डी संधू याने त्याच्यासोबत घडलेली आणखी एक घटना सांगितली… एका तरुणाने संधू याच्यावर बाटली फेकली होती. तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याला बाहेर जाण्यासाठी सांगितलं, पण तो फरार झाला. त्यानंतर हार्डी संधू याने कार्यक्रम बंद केला….

हार्डी संधू बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय संधू याने गायलेली अनेक गाणी हीट झाली आहेत. ‘बिजली बिजली’, ‘जोकर’, ‘सोच’ यांसाठी हार्डी संधू प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर देखील गायकाचे अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हार्डी संधू याची चर्चा रंगली आहे.

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.