ReKha यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास; हृदय विकाराच्या झटक्यानं निधन

| Updated on: Jun 25, 2023 | 11:15 AM

फक्त रेखाच नाही तर प्रसिद्ध अभिनेत्याच्या आयुष्यात 'या' सेलिब्रिटीला महत्त्वाचं स्थान; त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा...

ReKha यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास; हृदय विकाराच्या झटक्यानं निधन
Follow us on

मुंबई | अभिनेत्री रेखा यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. ज्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध सिनेमा निर्माते कुलजीत पाल (Filmmaker Kuljit Pal) यांचं निधन झालं आहे. कुलजीत पाल यांच्या निधनामुळे फक्त त्यांच्या कुटुंबावर नाही तर, बॉलिवूडवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रविवारी दुपारी १२ वाजता कुलजीत पाल यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंबईतील सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत कुलजीत पाल यांच्यावर अंतीमसंस्कार होणार आहेत. शिवाय बॉलिवूडमधील महत्त्वाच्या व्यक्तीचं निधन झाल्यामुळे २९ जून रोजी सायंकाळी शोक सभेचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. कुलजीत पाल यांच्या निधनांमुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.

कुलजीत पाल यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर नव्हती. याच दरम्यान २४ जून रोजी कुलजीत पाल यांना हृदय विकाराच्या झटका आला आणि त्यांचं निधन झालं. कुलजीत पाल याच्या मॅनेजरने त्यांच्या निधनाची माहिती दिली. ‘हृदय विकाराच्या झटक्यामुळे कुलजीत पाल यांचं निधन झालं. शिवाय गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते…’ अशी माहिती कुलजीत यांच्या मॅनेजरने दिली आहे.

रेखा यांच्या आयुष्यात कुलजीत यांचं फार महत्त्वाचं स्थान आहे. कुलजीत यांनी रेखा यांना बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला होता. प्रोजेक्ट यशस्वी होवू शकला नाही. पण रेखा यांना ब्रेक देणारे कुलजीत पहिले निर्माते होते. शिवाय कुलजीत यांची मुलगी देखील बॉलिवूडमध्ये सक्रिय होती.

हे सुद्धा वाचा

कुलजीत यांच्या मुलीचं नाव अनू पाल आहे. अनू यांनी देखील काही सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. ‘आज’ सिनेमात कुलजीत यांच्या मुलगी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. राजीव भाटिया याने देखील सिनेमात मार्शल आर्ट ट्रेनरची भूमिका साकारली होती, मात्र जेव्हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा फक्त अभिनेत्याीची फक्त पाठ दिसत होती.

अशात राजीव भाटिया याने वांद्रे न्यायालयात जावून स्वतःचं नाव बदललं आणि अक्षय कुमार ठेवलं. अक्षय कुमार आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. कुलजीत पाल यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक सिनेमांची निर्मिती केली.

कुलजीत पाल यांनी त्यांच्या कारकिर्दीत अर्थ, आज, परमात्मा, वासना, दो शिकारी आणि आशियाना यांसारख्या सिनेमांची निर्मिती केली. अशात त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं आहे.