Holi 2023 : बॉलिवूडची ‘ही’ गाणी तुमच्या ओठांवर आली नाही तर, ती रंगपंचमी कसली?
बॉलिवूडच्या 'या' गाण्यांमुळे प्रत्येक वर्षांतील होळी होते खास; रंगपंचमीच्या काही गाण्यांनी तोडले अनेक रेकॉर्ड... बॉलिवूडच्या गाण्यांमुळे होळीचा उत्साह आणखी वाढतो.
Holi 2023 : बॉलिवूडच्या गाण्याशिवाय कोणताही सण अपूर्ण आहे. आता मंगळवारी होळी आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी रंगपंचमीचा उत्साह पहायला मिळणार आहे. अशात बॉलिवूडच्या काही गाण्यांमुळे प्रत्येकाची होळी खास होणार आहे. बॉलिवूडच्या गाण्यांमुळे होळीचा उत्साह आणखी वाढतो. होळी म्हणजे रंगांचा उत्सव. मंगळवारी प्रत्येक जण आपल्या जवळच्या व्यक्तींना होळीच्या शुभेच्छा देत रंग लावणार.. तर नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्षातील होळी खास करण्यासाठी बॉलिवूडची काही खास गाणी तुमच्या ओठांवर आली नाही तर, ती रंगपंचमी कसली? तर मंगळवारी रंगपंचमीच्या निमित्ता बॉलिवूडच्या या गाण्यावर नक्की ठेका धरा…
‘होली के दिन दिल मिल जाते हैं’ हे गाणं आजही चाहत्यांच्या मनात आणि ओठांवर आहे. ‘शोले’ सिनेमातील हे गाणं आजही तुफान प्रसिद्ध आहे. सिनेमात अभिनेते अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
अभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा आणि राजीव कुमार यांची मुख्य भूमिका असलेला सिलसिला सिनेमा 1981 साली प्रदर्शित झाला. सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन केलं. सिनेमातील ‘ रंग बरसे भीगे चुनर वाली’ हे गाणं रंगपंचमीच्या दिवशी आजही चाहचे म्हणत असतात.
1982 साली प्रदर्शित झालेल्या ‘नदी के पार’ सिनेमातील ‘जोगी जी धीरे’ हे सुपरहिट गाणं होळीच्या दिवशी ऐकण्यासाठी आजही खूप सुंदर आणि मधुर वाटतं. या गाण्याशिवाय होळी अपूर्ण वाटते.
अभिनेता शाहरुख खान स्टारर डर सिनेमातील ‘अंग से अंग लगाना साजन हमे ऐसे रंग लगाना’ हे गाणे सर्वांना आठवत असेल. यश चोप्रा यांच्या सिनेमातील हे गाणे होळीच्या दिवशी आजही चाहत्यांना आठवतो. 1993 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट सुपरहिट ठरला.
अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री हेमा मालिनी स्टारर ‘बागबान’ सिनेमातील प्रत्येक गाणं हिट ठरलं. पण ‘होली खेले रघुवीरा’ या गाण्याने चाहत्यांचं मन जिंकलं.
‘ये जवानी है दिवानी’ सिनेमा 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. पण आजही अनेक जण सिनेमा मोठ्या आनंदाने पाहतात. सिनेमातील ‘बलम पिचकारी’ हे गाणं होळीसाठी अत्यंत खास आहे.