Bollywood | ‘या’ अभिनेत्रीचं लग्न झालंय की नाही? 2 महिन्यांच्या मुलाचा फोटो पोस्ट करत म्हणाली…

Bollywood | अभिनेत्रीने एप्रिल महिन्यात प्रेग्नेंसीची घोषणा केली, ऑगस्टमध्ये मुलाला जन्म दिला, पण अभिनेत्रीच्या मुलाचे बाबा कोण? २ महिन्याच्या मुलाचा फोटो पोस्ट करत म्हणाली..., सोशल मीडियावर सर्वत्र अभिनेत्रीच्या मुलाच्या फोटोंची चर्चा... पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव...

Bollywood | 'या' अभिनेत्रीचं लग्न झालंय की नाही?  2 महिन्यांच्या मुलाचा फोटो पोस्ट करत म्हणाली...
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 8:19 AM

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नाआधी आई होण्याचा निर्णय घेतला. आज काही अभिनेत्री त्यांच्या बॉयफ्रेंड आणि मुलांसह आनंदी आयुष्य जगत आहेत. पण बॉलिवूड एक अशी अभिनेत्री देखील आहे, जी तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार काही चाहत्यांसोबत शेअर करत नाही. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणीही नसून अभिनेत्री इलियाना डिक्रूज आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. इलियाना आणि बॉयफ्रेंड मायकल डोलन यांनी १ ऑगस्ट २०२३ मध्ये मुलाचं जगात स्वागत केलं. दोघे देखील त्यांच्या मुलाबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असतात.

आता देखील इलियाना हिने लेकाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘२ महिने झाले आहेत…’ असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त इलियाना आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, ऑगस्ट महिन्यात अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्ट करत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. अभिनेत्रीने मुलाचं नाव कोआ फिनिक्स डोलन असं ठेवलं आहे. इलियाना कायम सोशल मीडियावर मुलासोबत फोटो पोस्ट करत असते. अभिनेत्री तिच्या मुलाबद्दल अनेक गोष्टी शेअर करत असते, पण इलियाना हिने तिच्या जोडीदाराबद्दल गुपित ठेवलं आहे.

अभिनेत्रीने यावर्षी एप्रिलमध्ये तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती आणि जोडीदाराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. इलियाना तिच्या पर्सनल लाइफबद्दल मौन बाळगून आहे आहे. अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड मायकेल डोलन कोण आहे, तो काय करतो… याबद्दल अद्याप काहीही कळलेलं नाही.

इलियाना हिचे सिनेमे

इलियाना हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री रॅपर बादशाह याच्या ‘गजब’ म्यूजिक व्हिडीओमध्ये दिसली होती. याशिवाय अभिनेत्रीने ‘द बिग बुल’, ‘बर्फी’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात व्यस्त आहे. मुलगा आणि बॉयफ्रेंडसोबत अभिनेत्री आनंदी आयुष्य जगत आहे.

इलियाना आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.