Jannat Zubair | ‘वडिलांसाठी किसिंग सीन…’, २१ वर्षीय जन्नत झुबेर हिला वाटत नाही एका गोष्टीची खंत

'वडिलांनी घेतलेल्या निर्णयाची खंत नाही, कारण...', अभिनेत्री जन्नत झुबेर हिने 'त्या' किसिंग सीनबद्दल मांडली स्पष्ट भूमिका, अभिनेत्री सध्या तुफान चर्चेत..

Jannat Zubair | 'वडिलांसाठी किसिंग सीन...', २१ वर्षीय जन्नत झुबेर हिला वाटत नाही एका गोष्टीची खंत
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 1:29 PM

मुंबई : अभिनेत्री जन्नत झुबेर फक्त अभिनेत्री नसून सोशल मीडिया स्टार देखील आहे. सोशल मीडियावर जन्नतचे असंख्य व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. ‘फुलवा’ मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री जन्नत झुबेर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही.. सोशल मीडियावर जन्नतच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जन्नत कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव देखील करत असतात. एवढंच नाही तर जन्नत लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.. पण यावर जन्नत हिने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही..

जन्नत झुबेर हिने फक्त अभिनयात नाही तर गायन क्षेत्रात देखील पदार्पण केलं आहे. काही महिन्यांपूर्वी जन्नत झुबेर हिचं ‘बाबू शोना मोना’ गाणं प्रदर्शित झालं होतं.. आता जन्नत ‘बिग बॉस ओटीटी २’ मध्ये झळकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.. त्यामुळे ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात अभिनेत्रीला पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत..

बिग बॉस ओटीटीसाठी नाव चर्चेत येण्यापूर्वी जन्नतने ‘तू आशिकी’ मालिकेच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.. मालिकेत अभिनेत्री को-स्टारसोबत इंटिमेट सीन द्यायचे होते.. पण अभिनेत्रीने किसिंग सीनसाठी नकार दिला… नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री तिच्या ‘नो किसिंग पॉलिसी’बद्दल सांगितलं आहे..

हे सुद्धा वाचा

‘नो किसिंग पॉलिसी’बद्दल जन्नत झुबेर म्हणाली, ‘वडिलांनी मला मालिकेत किसिंग सीन करु नकोस म्हणून सांगितलं होतं. तेव्हा मी फक्त १७ वर्षांची होती. माला माझ्या चौकटीतून बाहेर यायचं नव्हत. माझ्यासाठी ती गोष्ट प्रचंड कठीण आहे. जेव्हा मी सर्वांसमोर ‘नो किसिंग पॉलिसी’बद्दल जाहीर केलं. तेव्हा सर्वांनी माझ्या निर्णयाचं स्वागत केलं…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ”नो किसिंग पॉलिसी’बद्दल घोषणा केल्यानंतर कोणी माझा विरोध केला नाही किंवा कोणती कमेंट केली नाही.. माझ्या वडिलांनी घेतलेल्या निर्णयाची मला खंत वाटत नाही..’ सध्या जन्नत झुबेर तिच्या ‘नो किसिंग पॉलिसी’मुळे तुफान चर्चेत आहे.. जन्नत झुबेर झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध नाव आहे.. चाहत्यांमध्ये देखील अभिनेत्रीबद्दल कायम चर्चा रंगलेल्या असतात..

जन्नत हिला पाहिल्यानंतर तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी जमते. शिवाय जन्नत तिच्या लहान भावासोबत देखील व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असते.. सध्या सर्वत्र जन्नत झुबेर हिची चर्चा रंगलेली असते..

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....