Suhana Khan | खोतांकडून जमीन विकत घेऊन शाहरुखची मुलगी सुहाना शेतकरी कशी बनली? कायदा काय सांगतो?
Suhana Khan | तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा मित्राला तुमच्या मालकी हक्काची कुठलीही प्रॉपर्टी गिफ्ट करु शकता का? यासाठी नियम-कायदा काय आहे? इन्कम टॅक्स लागतो का?
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानची मुलगी कागदावर शेतकरी बनली आहे. तुम्ही विचार कराल, अशी काय परिस्थिती ओढवली की, सुहाना खानला शेतकरी बनावं लागलं. सुहानाने अलिबागमध्ये एक प्रॉपर्टी शेतीच्या नावावर विकत घेतली आहे. यात खास बाब म्हणजे ही जमीन गौरीची आई आणि बहिणीच्या फार्मिंग कंपनीच्या नावावर रजिस्टर्ड आहे. आता प्रश्न हा निर्माण होतो की, तुम्ही तुमची जवळची व्यक्ती किंवा मित्राला प्रॉपर्टी गिफ्ट करु शकता का? गिफ्ट करु शकत असाल, तर किती आणि कसं गिफ्ट करायचं?
प्रॉपर्टी गिफ्ट करण्यासाठी काही कायदे आणि नियम आहेत. कोणालाही जमीन गिफ्ट करताना, तुम्हाला या नियमांच पालन कराव लागेल. आता सुहाना शेतकरी कशी बनली? जमीन गिफ्ट करण्याचा हा विषय काय आहे? यासाठी नियम-कायदे काय आहेत? ते जाणून घेऊया.
हा व्यवहार कसा झालाय?
मीडिया रिपोर्ट्नुसार, सुहानाने 1.5 एकर जमीन शेतीच्या नावावर विकत घेतली आहे. सुहानाने अंजली, रेखा आणि प्रिया खोत यांच्याकडून ही जमीन विकत घेतलीय. तिघींना आपल्या आई-वडिलांकडून वडिलोपार्जित ही जमीन मिळाली होती. तिघी बहिणींनी या जमिनीसाठी 77.46 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी सुद्धा भरली आहे. या जमिनीच वैशिष्ट्य म्हणजे ही प्रॉपर्टी डेजा वू फॉर्म प्रायवेट लिमिटेडच्या नावावर रजिस्टर्ड आहे. या कंपनीची डायरेक्टर गौरी खानची आई सविता छिब्बर आणि बहिण नमिता छिब्बर आहे.
म्हणजेच सुहानाने ही जमीन विकत घेऊन आपली आजी आणि मावशीच्या कंपनीच्या नावावर रजिस्टर्ड केली आहे. या जमिनीची मालकी सुहानाकडे आहे. म्हणजे सुहाना या जमिनीवर शेतकरी म्हणून काम करणार आहे. या दीड एकर जमिनीची किंमत 12.91 कोटी रुपये आहे.
कुठली प्रॉपर्टी तुम्ही गिफ्ट करु शकता?
तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा मित्राला तुमच्या मालकी हक्काची कुठलीही प्रॉपर्टी गिफ्ट करु शकता. त्यासाठी तुम्हाला काही नियमांच पालन करावं लागेल. त्याचवेळी तुम्हाला प्रॉपर्टी गिफ्ट करता येईल.
गिफ्ट डीडवर किती स्टॅम्प ड्युटी भरावी लागते?
भारतात गिफ्ट डीड स्टॅम्प ड्युटी प्रत्येक राज्यात वेगवेगळी आहे. संपत्तीच्या मुल्यानुसार 2 टक्के ते 7 टक्क्या दरम्यान असू शकते.
गिफ्ट डीडवर इन्कम टॅक्स लागतो का?
इन्कम टॅक्स नियमानुसार, एकावर्षात कोणालाही जे गिफ्ट मिळतात, ते पूर्णपणे टॅक्स फ्री असतात. पण या गिफ्टसची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असू नये. जर एकवर्षात गिफ्टसची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, तर यावर कुठलीही सवलत मिळणार नाही. ते गिफ्ट टॅक्सेबल असेल. नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींसाठी टॅक्समध्ये काही सवलत आहे. एखादी संपत्ती खास नातेवाईकाला गिफ्ट म्हणून दिली, तर घेणाऱ्याला टॅक्स लागत नाही.
सुहानाने शेतीच्या नावावर जमीन कशी विकत घेतली?
सुहानाने ही जमीन विकत घेऊन डेजा वू फार्म प्रायवेट लिमिटेडच्या नावावर रजिस्टर केली आहे.