‘मैंने प्यार किया’ फेम प्रसिद्ध सेलिब्रिटीचा मृत्यू; निधनानंतर कलाविश्वाचं मोठं नुकसान
ज्या सेलिब्रिटीमुळे बॉलिवूडला मिळाली वेगळी दिशा, त्यानेच घेतला अखेरचा श्वास....., 'मैंने प्यार किया', 'बाजीगर' सिनेमांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या सेलिब्रिटीचं निधन.. कलाविश्वाचं मोठं नुकसान
मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘मैंने प्यार किया’, ‘बाजीगर’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या प्रसिद्ध सेलिब्रिटीचं निधन झालं आहे. ज्यामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध गीतकार देव कोहली यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी देव कोहली यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दोन-तीन महिन्यांपासून वयाच्या आजारामुळे देव कोहली यांना अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १० दिवसांपूर्वी त्यांनी रुग्णालयातून घरी देखील आणण्यात आलं होतं. पण ज्येष्ठ गीतकारा देव कोहली यांचं शनिवारी पहाटे ४ वाजता झोपेतच निधन झाले. देव कोहली यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
देव कोहली यांनी १०० पेक्षा जास्त सिनेमांसाठी लिहिली शकडो गाणी
देव कोहली यांनी ‘लाल पत्थर’, ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘बाजीगर’, ‘जुड़वा 2’, ‘मुसाफिर’, ‘इश्क’, ‘शूट आउट ऐट लोखंडवाला’, ‘टैक्सी नंबर 911’ यांसारख्या १०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये शकडो गाणी लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेली गाणी सुपरहिट देखील ठरली. आजही त्यांनी लिहिलेली गाणी लोकं ऐकत असतात.
देव कोहली यांनी अभिनेता सलमान खान याच्या ‘मैंने प्यार किया’ सिनेमासाठी कबूतर जा जा, आजा शाम होने आई, आते-जाते हंसते गाते, कहे तोसे सजना… गाणी लिहिली.. देव कोहली यांनी लिहिलेल्या गाण्यांमुळे बॉलिवूडला एक वेगळी दिशा मिळाली होती. पण आता त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं असं म्हणायला हरकत नाही…
देव कोहली यांनी त्यांच्या करियरमध्ये राम लक्ष्मण यांच्यापासून अन्नू मलिक, आनंद मिलिंद, आनंद राज यांसारख्या प्रसिद्ध गीतकारांसोबत काम केलं आहे. अशात देव कोहली यांच्या निधनानंतर कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. देव कोहली यांच्यानिधनांतर बॉलिवूड सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत.
देव कोहली यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव मुंबईतील त्यांच्या लोखंडवाला येथील घरी दुपारी २ वाजल्यापासून ठेवण्यात येणार आहे. तर आज मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.