‘मर्डर’, ‘मर्डर 2’, ‘टायगर 3’, ‘जन्नत’, ‘आशिक बनाया आपने’, ‘राझ 3’, ‘हमारी अधुरी कहानी’, ‘सेल्फी’, ‘कलयूह’ अशा अनेक सिनेमांमध्यें महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेता इमरान हाश्मी प्रसिद्धी झोतात आहे. पण अभिनेता सिनेमातील त्याच्या किसिंग सीनमुळे अधिक चर्चेत आला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत इमरान याने किसींग सीन माझा पेटेंट आहे आणि प्रत्येक अभिनेत्याचा पेटेंट वेगळा असतो… असं देखील अभिनेता म्हणाला होता. सध्या सर्वत्र इमरान हाश्मी याची चर्चा रंगली आहे.
अभिनेता इमरान हाश्मी याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सिनेमात अभिनेत्याने अनेक किसिंग सीन दिले आणि इमरान हाश्मी बॉलिवूडचा ‘सिरियल किसर’ झाला. नुकताच झालेल्या मुलाखतीत इमरान याने किसिंग सीनबद्दल वक्तव्य केलं आहे.
सिनेमात किसिंग सीन कसे शूट केले जातात याबद्दल अभिनेत्याने सांगितलं आहे. इमरान म्हणाला, ‘ज्याप्रकारे अन्य सीन शूट होतात, त्याच प्रमाणे किसिंग सीन देखील शूट होतात. दोन्ही सीनमध्ये काहीही फरक नसतो…सिरियल किसर म्हणून आज माझी ओळख आहे..’
‘पण यासाठी मी कोणाला दोष देत नाही. 2009 पर्यंत माझ्या कारकिर्दीचा हा मोठा भाग होता. 7-8 वर्षांपासून, माझी हीच प्रतिमा निर्माते विकत होते. मी ते स्वतः विकत होतो…’ असं देखील अभिनेता म्हणाला. इमरान आज बॉलिवूडपासून दूर असला तरी कोणत्या न कोणत्या तरी कारणामुळे कायम चर्चेत असतो.
आज इमरान बॉलिवूडपासून दूर असला तरी सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. इमरान देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
इमरान हाश्मी याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘शो’ टाईम वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला होता. सिनेमात अभिनेत्यासोबत अभिनेत्री मौनी रॉय हिने स्क्रिन शेअर केली होती. तर ‘टायगर 3’ मध्ये देखील इमरान हाश्मी याने खलनायकाची भूमिका साकारली होती. सिनेमात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होती.