प्रसिद्ध गायक अदनान सामी याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अदनान याच्या आईने वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अदनान याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आईच्या निधनाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सध्या गायकाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अदनान याने इन्स्टाग्रामवर आईचा एक फोटो पोस्ट करत आईचं निधन झाल्याचं सांगितलं आहे. पण गायकाच्या आईचं निधन नक्की कोणत्या कारणामुळे झाले आहे… हे अस्पष्ट आहे.
आईचा फोटो पोस्ट करत अदनान म्हणाला, ‘मी अत्यंत दुःखाने सांगत आहे की माझी आई बेगम नौरीन सामी यांचं निधन झालं आहे. आईच्या निधनानंतर कुटुंब पोरकं झालं आहे. ती एक अविश्वसनीय स्त्री होती. तिने जवळच्या प्रत्येक व्यक्तीला प्रेम आणि आनंद दिला. आम्हाला त्याची खूप आठवण येईल. त्यांच्या दिवंगत आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…’ अशी पोस्ट गायकाने केली आहे.
सांगायचं झालं तर, आईच्या निधनानंतर अदनान सामी पूर्णपणे कोलमडला आहे. अदनान आईच्या वाढदिवशी कायम आईचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आईवर असलेलं प्रेम व्यक्त करायचा… आता गायकाच्या आईच्या निधनानंतर कुटुंबिय आणि मित्र-परिवार देखील दुःख व्यक्त करत आहेत. चाहते देखील कमेंटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. अदनान सामी याच्या आईचा जन्म 1947 मध्ये झाला होता.