सासरच्यांनी करीयर केलं उद्ध्वस्त, नवऱ्याने केली फसवणूक’, खडतर होतं गायिकेचं खासगी आयुष्य
तीन मुलांच्या जन्मानंतर नवऱ्याने सोडली साथ, तिन्ही मुलांची जबाबदारी खांद्यावर असलेल्या गायिकेचं खडतर आयुष्य, सासरच्यांनी तिचं करीयर केलं उद्ध्वस्त, नवऱ्याने केली फसवणूक...

झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील एका प्रसिद्ध गायिकेच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहे. सासरच्यांनी करियर उद्ध्वस्त केल्यानंतर पतीने देखील साथ सोडली. अशात तीन मुलांची जबाबदारी एकट्या गायिकेवर होती. सध्या ज्या गायिकेच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत, ती गायिका दुसरी तिसरी कोणी नसून कनिका कपूर आहे.
कनिका कपूर हिचं प्रोफेशनल आयुष्य फार उत्तम राहिलं आहे. ‘बेबी डॉल’, ‘चिटिया कलाईयां’ यांसारखी अनेक गाणि कनिका हिने गायली आहे. पण कानिकाचं खासगी आयुष्य मात्र फार खडतर होतं. सांगायचं झालं तर, लहानपणापासून कनिका हिला गाण्याची आवड होती. संगीत विश्वात तिला स्वतःचं करियर घडवायचं होतं. पण वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी कनिकाचं लग्न झालं.
लग्नानंतर कनिका नवऱ्यासोबत लंडन याठिकाणी गेली. लग्नानंतर कनिका हिने तीन मुलांना जन्म दिला. कनिका दोन मुली आणि एका मुलाची आई आहे. एका जुन्या मुलाखतीत कनिका हिच्या सासरच्या मंडळींना तिच्यासमोर एक अट ठेवली होती.
लग्नानंतर कनिका प्रोफेशनली गाऊ शकत नाही… असं सासरच्यांनी सांगितलं. अशात कनिकाने घरातच सराव सुरु ठेवला. कनिया तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी नव्हती. अखेर कनिकाने नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नवरा कनिकाची फसवणूक करत होता… असं देखील अनेकादा समोर आलं. शिवाय कनिकाने नवऱ्याल रंगे हात पकडलं त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला.
घटस्फोटानंतर कनिकाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. कारण तीन मुलांची जबाबदारी तिच्या एकटीवर होती. मुलाखतीत कनिका म्हणाली, ‘माझ्याकडे पैसे नव्हते. घटस्फोटानंतर अत्यंत कठीण दिवसांचा सामना केला. वकील सारखे पैसे मागायचे. मुलांच्या शाळेची फी भरायला पैसे नव्हते. म्हणून त्यांना शाळेतून काढलं होतं.’
‘पण तेव्हा मला माझ्या आई आणि भावाने खूप मदत केली. माझे अनेक मित्र देखील माझ्यासोबत होते.’ असं देखील कनिका एका मुलाखतीत म्हणाली होती. पहिलं लग्न अयशस्व ठरल्यानंतर कनिकाने 2022 मध्ये दुसरं लग्न केलं. NRI उद्योजक गौतम हाखीरमणी याच्यासोबत कनिकाने लग्न केलं.
लग्नात गायिकेचा मुलगाच तिली मंडपापर्यंत घेऊन आला. तर दोन्ही मुली कनिका हिच्यासोबत होत्या. दुसऱ्या लग्नानंतर कनिका आनंदी आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर देखील कनिका कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.