सिनेमे होतात फ्लॉप तरीही अक्षय कुमार कमावतो कोट्यवधींची माया, हजारो कोटींमध्ये अभिनेत्याची संपत्ती
Akshay Kumar Net Worth: अभिनेता अक्षय कुमारची संपत्ती, आलिशान घर, महागड्या गाड्या... सिनेमे फ्लॉप होत असताना अभिनेता कसं करतो कोट्यवधींची कमाई... आकडा जाणून व्हाल हैराण
अभिनेता अक्षय कुमार याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही चाहत्यांमध्ये अक्षय कुमार याची चर्चा रंगलेली असते. अभिनेता गेल्या 3 दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. अभिनेत्याने स्वतःच्या मेहनतीच्या जोराववर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्या सिनेमा मोठ्या पडद्यावर अपयशी ठरत आहेत. असं असताना देखील खिलाडी कुमारच्या संपत्तीमध्ये घट झालेली नाही.
सांगायचं झालं तर, अभिनेत्याने 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सौगंध’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमामुळे अक्षय कुमारच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. त्यानंतर अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. एकामागे एक अक्षयने हीट सिनेमे बॉलिवूडला दिले.
View this post on Instagram
दरम्यान, कोरोनानंतर अक्षय कुमारचा एकही सिनेमा हीट झालेला नाही. अक्षय कुमारच्या सिनेमांकडे प्रेक्षक पाठ फिरवत आहेत. पण असं असताना खिलाडी कुमारच्या संपत्ती आणि कमाईत घट झालेली नाही. दिवसागणिक अक्षय कुमार याच्या संपत्तीमध्ये वाढ होत आहे. रिपोर्टनुसार, अक्षय कुमार याची नेटवर्थ 2,500 कोटी रुपये आहे. अभिनेता कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगतो.
रिपोर्टनुसार, अक्षय कुमार एका सिनेमासाठी 60 ते 140 कोटी रुपये घेतो. अभिनेता फक्त सिनेमांमधून नाही तर, इतर मार्गांनी देखील कोट्यवधींची कमाई करतो. नुकताच, अभिनेता ‘खेल खेल में’ सिनेमात दिसला होता. ज्यासाठी अभिनेत्याने 60 कोटी रुपये मानधन घेतलं.
सिनेमांव्यतिरिक्त, अक्षय कुमारची बहुतेक कमाई ब्रँड एंडोर्समेंटमधून येते. रिपोर्ट्सनुसार, तो प्रत्येक पेड ब्रँड डीलसाठी सुमारे 6 कोटी रुपये घेतो. अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्ना आणि त्यांच्या दोन मुलांसह जुहू येथे समुद्रासमोर असलेल्या आलिशान डुप्लेक्समध्ये राहतो. हाऊसिंग डॉट कॉमच्या मते, त्याच्या आलिशान घराची किंमत 60 कोटी रुपये आहे.
याशिवाय अक्षय याच्याकडे अनेक मालमत्ता आहेत ज्यात खार पश्चिम येथे 7.8 कोटी रुपयांचे 1,878 चौरस फुटांचे अपार्टमेंट आणि गोव्यात 5 कोटी रुपयांचे पोर्तुगीज शैलीतील व्हिला यांचा समावेश आहे. अभिनेत्याला महागड्या कारचं देखील शोक आहे. अनेक महागड्या गाड्या अक्षयच्या गॅरेजमध्ये आहेत. अक्षय कुमारकडे 260 कोटी रुपयांचे खाजगी जेट देखील आहे. अक्षय कुटुंबासोबत आलिशान आयुष्य जगतो.