Amitabh Bachchan यांच्यावर शस्त्रक्रिया, चाहत्यांनी व्यक्त केली चिंता…

Amitabh Bachchan Surgery : अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर.... बिग बींची झालीये शस्त्रक्रिया, चाहत्यांनी व्यक्त केली चिंता... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांची चर्चा...

Amitabh Bachchan यांच्यावर शस्त्रक्रिया, चाहत्यांनी व्यक्त केली चिंता...
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 8:41 AM

मुंबई | 16 जानेवारी 2024 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. अमिताभ बच्चन यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये स्वतःची टीम तयार केली आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अमिताभ बच्चन यांच्या हाताला पट्टी लावलेली दिसत आहे. तर हाताला काळ्या रंगाची पट्टी का लावली आहे… याचं कारण खुद्द अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून दिलं आहे. हाताची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना दिली आहे. बिग बी यांच्या शस्त्रक्रियेची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली… पण आता अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाताची शस्त्रक्रिया झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) साठी जाहिरात देखील शूट केली आहे. बिग बी यांनी अभिनेता अक्षय कुमार आणि सुर्या यांच्यासोहत जाहिरातीचं शुटिंग केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांनी चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग यानी (ISPL)?

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या आधारावर तयार करण्यात आली आहे. या लीगमध्ये अनेक सामने होतील. यामध्ये अनेक स्टार्सनी आपापल्या टीम बनवल्या आहेत, ज्यामध्ये अमिताभ बच्चन हे मुंबई टीमचे मालक आहेत. तर अक्षय कुमारची टीम श्रीनगर आहे. ही एक क्रिकेट स्पर्धा आहे.

क्रिकेट सामन्यांची सुरुवात 2 मार्चपासून सुरू होणार असून तो 9 मार्चपर्यंत मुंबईत रंगणार आहेत. या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार आहेत. या लीगमध्ये अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्याशिवाय सूर्या, सैफ अली खान, राम चरण, करीना कपूर खान आणि हृतिक रोशन यांच्या टीमचा समावेश आहे.

अमिताभ बच्चन यांचे आगामी सिनेमे

अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, बिग बी लवकरच Kalki 2898 AD सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सिनेमाच अमिताभ यांच्यासोबत अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय सिनेमा कमल हासन, दुल्कर सलमान आणि दिशा पटानी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. पण सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची घोषणा करण्यात आलेली नाही…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.