धर्मेंद्र यांना वयाच्या 88 व्या वर्षी कोणत्या गोष्टीचा होतोय पश्चाताप? ‘तो’ भावूक करणारा फोटो व्हायरल
Dharmendra | अभिनेते धर्मेंद्र यांना कोणत्या गोष्टीचा होतोय पश्चाताप? वयाच्या 88 वर्षी मनातील खंत अखेर बोलून दाखवलीच... 'तो' भावूक करणारा फोटो तुफान व्हायरल..., सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांनी पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा...
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही अनेक चाहते धर्मेंद्र यांचे सिनेमे तितक्याच आवडीने आणि उत्साहाने पाहतात. वयात्या 88 व्या वर्षी देखील चाहत्यांमध्ये धर्मेंद्र याची असलेली क्रेझ कमी झालेली नाही. धर्मेंद्र आजही सिनेमांमध्ये सक्रिय आहेत. सोशल मीडियावर देखील धर्मेंद्र कायम व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असतात. चाहते देखील धर्मेंद्र यांच्या नव्या पोस्टच्या प्रतीक्षेत असतात.
दरम्यान, धर्मेंद्र यांनी एक्सवर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये देओल कुटुंबाच्या तीन पिढ्या दिसत आहेत. धर्मेंद्र यांनी वडील आणि मुलासोबत एक खास फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत धर्मेंद्र यांनी भावूक कॅप्शन देखील लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांनी पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा रंगली आहे.
kaash! MAA BAAP ko aur waqt diya hota ! pic.twitter.com/GuFxI93Aaf
— Dharmendra Deol (@aapkadharam) April 28, 2024
धर्मेंद्र यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अभिनेते वडील आणि मुलगा सनी देओल याच्यासोबत आनंदी दिसत आहे. फोटो पोस्ट करत धर्मेंद्र यांनी कॅप्शनमध्ये, ‘जर आई – वडिलांना आणखी वेळ दिला असता…’ असं लिहिलं आहे. धर्मेंद्र यांच्या पोस्टवरून स्पष्ट कळत आहे की, व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आई – वडिलांना दिला असता तर, पश्चाताप झाला नसता… फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
धर्मेंद्र यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 88 व्या वर्षी देखील अभिनेते त्यांच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. नुकतात धर्मेंद्र अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सनॉन स्टारर ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आले होते.
गेल्या वर्षी धर्मेंद्र ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले होते. सिनेमात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमात अभिनेत्री जया बच्चन आणि शबाना आझमी यांची देखील महत्त्वाची भूमिका होती. सिनेमात शबाना आणि धर्मेंद्र यांचा किसिंग सीन होता.
दोघांच्या किसिंग सीनची तुफान चर्चा रंगली आहे. अनेकांनी त्यांच्या किसिंग सीनचा विरोध देखील केला होता. खुद्द धर्मेंद्र यांनी देखील किसिंग सीनवर स्वतःचं मत व्यक्त केलं होतं. धर्मेंद्र कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात.