Salman Khan | ‘रस्त्यावर गरिबांना मारणाऱ्यांना देखील आता भारतात…’, ‘या’ अभिनेत्याने भाईजानवर साधला निशाणा?
सलमान खान याच्यावर अनेक आरोप! बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याने साधला भाईजानवर निशाणा, म्हणाला, 'रस्त्यावर गरिबांना मारणाऱ्यांना देखील आता भारतात...'
मुंबई : अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. खासगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चेत असणाऱ्या सलमान खान याने नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. आता बॉलिवूडच्या एका अभिनेत्याने सलमान खान याच्यावर निशाणा साधला आहे. ज्यामुळे अभिनेता पुन्हा चर्चेत आला. बॉलिवूडच्या या अभिनेत्याने सलमाान खान याचं नाव न घेता मोठं वक्तव्य केलं आहे. याआधी देखील अभिनेत्याने अनेक सेलिब्रिटींवर निशाणा साधत ट्विट केलं. ज्यामुळे त्याला अनेक वादग्रस्त परिस्थितीचा सामना करावा लागला. सेलिब्रीटींविरोधात करत असलेल्या वक्तव्यामुळे तो कायद्याच्या कचाट्यात देखील अडकला… हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून कमाल राशिद खान म्हणजे केआर के आहे.
केआरके याने फक्त सलमान खान याच्या विरोधातच नाही तर, अभिनेता अक्षय कुमार, आमिर खान, करण जोहर यांसारख्या सेलिब्रिटींवर देखील निशाणा साधला आहे. आता पुन्हा केआरके याने सलमान खान याचं नाव न घेता भाईजानवर निशाणा साधला आहे. सध्या सर्वत्र केआरके याच्या ट्विटची चर्चा रंगत आहे.
केआरके ट्विट करत म्हणाला, ‘गरिबांना रस्त्यावर मारल्यानंतर जे लोक मोकळेपणाने फिरत आहेत… त्यांना आता भारतातील समस्या दिसू लागल्या आहेत. समस्या तर आहेत. समस्या नसत्या तर असे लोक आज तुरुंगात असते…’ सध्या सर्वत्र केआरके याचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. केआरके याच्या ट्विटनंतर सलमान खान पुन्हा चर्चेत आला आहे.
केआरके याच्या ट्विटवर अनेक नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘तू देखील दुबईमध्ये राहतो… तुला देखील भारतात समस्या जाणवत आहेत..’, दुसरा युजर म्हणाला, ‘आमिर खान आणि किरण राव यांच्यानंतर आता सलमान खान याला देखील भारतात भीती वाटत आहे…’, तिसरा युजर म्हणाला, ‘सिनेमाला यश मिळालं नाही, त्यामुळे भारतात समस्या आहेत… वा रे बॉलिवूड…’
दरम्यान, काही दिवसांपासून सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अशात मिळणाऱ्या धमक्यांवर एका कार्यक्रमात खुद्द सलमान खान याने वक्तव्य केलं. अभिनेता म्हणाला, ‘असुरक्षिततेपेक्षा सुरक्षितता चांगली आहे…. सुरक्षा आहे… आता रस्त्यावर सायकल चालवणं आणि एकट्याने कुठेही जाणं शक्य नाही. जेव्हा ट्रॅफिकमध्ये असतो तेव्हा मला अधिक त्रास होतो. माझ्या सुरक्षेमुळे इतर लोकांची गैरसोय होते. ते सर्व मलाही लुक देतात. माझे चाहते… पण मोठा धोका आहे म्हणून सुरक्षा आहे…’ असं सलमान खान म्हणाला होता.