बॉलिवूडकरांची मुलं शिकतात इतक्या महागड्या शाळेत; फी ऐकून व्हाल थक्क
मुलांसाठी कोणत्या शाळेला प्राधन्य देतात बॉलिवूडकर; माधुरी दीक्षितची मुलं शिकतात सर्वात महागड्या शाळेत
Bollywood Celeb: बॉलिवूडकरांचं आयुष्य कसं असतं, त्यांची लाईफ स्टाईल कशी असते. त्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकतात. इत्यादी गोष्टी चाहत्यांच्या जाणून घ्यायच्या असतात. आपल्या मुलांसाठी बॉलिवूडकर कोणत्या शाळेला प्राधान्य देतात. भारतात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक स्टारकिड्स परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. पण मुंबईत असताना बॉलिवूडकरांची मुलं अनेक महागड्या शाळांमध्ये शिकतात. आज जाणून घेवू बॉलिवूडकरांच्या महागड्या शाळांबद्दल.
आराध्या बच्चन अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन कुटुंबाची सर्वात लाडली लेक आहे. आराध्या धिरुबाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकते. धिरुबाई अंबानी इंटरनॅशनल शाळा नीता अंबानी यांनी २००३ साली सुरु केली. आराध्याने तिच्या शिक्षणाची सुरुवात अंबानी स्कूलमध्येच केली.
अब्राहम खान बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानचा मुलगा अब्राहम खान देखील धिरुबाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकतो. अब्राहमने त्याच्या शिक्षणाची सुरुवात अंबानी स्कूलमध्येच केली. अब्राहम नाही, तर आर्यन आणि सुहाना खान यांचं शिक्षण देखील अंबानी स्कूलमध्ये झालं आहे.
अरिन आण रयान माधुरी दीक्षितची दोन्ही मुलं मुंबईच्या ओबरॉय इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात. ओबरॉय इंटरनॅशनल स्कूल भारतातील सर्वात टॉप शाळांपैकी एक आहे. आता अभिनेत्रीचा मोठा मुलगा अमेरिकेत शिकत आहे. अनेक सेलिब्रिटींची मुलं ओबरॉय इंटरनेशनल स्कूलमध्ये शिकतात.
आरव कुमार अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा मुलगा आरव कुमार यांचा मुलगा जुहू स्थित इकॉले मोंडिआले वर्ल्ड स्कूलमध्ये शिकतो. रिपोर्टनुसार अभिनेत्याची मुलगी देखील इकॉले मोंडिआले वर्ल्ड स्कूलमध्ये शिकते.
महत्त्वाचं सांगायचं झालं, तर बॉलिवूडकरांची अनेक मुलं धिरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात. अनेक सेलिब्रिटींची पहिली पसंती धिरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल आहे. उत्तम सेक्यूरिटी आणि सर्व सुविधा असलेलं शिक्षण या सेलिब्रिटी किड्सचा घडवायला मदत करणार असतं.
त्यामुळे अनेक सेलिब्रिटी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या शाळेत मुलांना शालेय शिक्षणसाठी पाठवताना दिसतात. अंबानी शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सेलिब्रिटींची मुलं उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. पण त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मुंबईतच होते.