‘या’ देशी दारुचा चाहता आहे नवाजुद्दीन सिद्दीकी, किंमत जाणून म्हणाल…
Nawazuddin Siddiqui | नवाजुद्दीन सिद्दीकी विदेशी नाही तर, देशी दारुच्या प्रेमात, एका बाटलीची किंमत जाणून व्हाल थक्क... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा...

झगमगत्या विश्वात पार्टी एक सामान्य गोष्ट झाली आहे. सेलिब्रीटी आणि स्टारकिड्स देखील पार्टी करताना फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. पण बॉलिवूडचा एक अभिनेता असा आहे, ज्याने मुलाखतीत त्याच्या आवडत्या दारूचं नाव सांगितलं होतं. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याला कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.
‘गँग्स ऑफ वासेपूर’ सिनेमामूळे नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली. असं देखील चाहत्यांचं म्हणणं आहे. अनेक सिनेमांमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याने एकापेक्षा एक भूमिका साकारली आहे. संपूर्ण भारतात नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगलेली असते.




View this post on Instagram
नवाजुद्दीन सिद्दीकी मुलाखतींमध्ये त्याच्या आवडी निवडी देखील सांगत असतो. एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या आवडत्या दारुबद्दल सांगितलं होतं. शिवाय अभिनेत्याने त्या मागचं कारण देखील सांगितलं होतं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नवाजुद्दीन सिद्दीकी याची चर्चा रंगली आहे.
नवाजुद्दीन म्हणाला होता, ‘मला होळी हा सण प्रचंड आवडतो. कारण तेव्हा दारु पिण्याची संधी मिळते.’ पुढे अभिनेत्याला त्याच्या आवडत्या दारुबद्दल विचारण्यात आलं. यावर अभिनेता म्हणाला, ‘मला ओल्ड मॉन्क आवडते…’ तुम्ही जाणून हैराण व्हाल की, ओल्ड मॉन्क देखील ब्रँड आहे.
ओल्ड मॉन्कच्या एका दारुच्या बाटलीची किंमत 350 ते 1 हजार रुपयांपर्यंत आहे. ओल्ड मॉन्कची किंमत बाटलीच्या आकारानुसार आहे. सांगायचं झालं तर, नवाजुद्दीन सिद्दीकी याचा आज वाढदिवस आहे. ज्यामुळे अभिनेत्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सरफरोश’ सिनेमातून नवाजुद्दीन सिद्दीकी याने करियरला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. चाहते देखील अभिनेत्याच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.