KKBKKJ | सिनेमाच्या कमाईला ब्रेक; ६ व्या दिवशी कमावले फक्त इतके कोटी

चाहत्यांचं मनोरंजन करण्यास सलमान खान फेल; अभिनेत्याची प्रसिद्धी पाहता 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या कमाईचा आकडा प्रचंड छोटा..

KKBKKJ | सिनेमाच्या कमाईला ब्रेक; ६ व्या दिवशी कमावले फक्त इतके कोटी
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 10:52 AM

मुंबई : अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ प्रदर्शनानंतर साहव्या दिवशी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास अपयशी ठरला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला आहे. ज्यामुळे निर्माते आणि दिर्गर्शकांची निराशा झाल्याचं चित्र दिसत आहे. अनेक दिवसांनंतर अभिनेता सलमान खान याचा ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सलमान चाहत्यांच्या भेटीस आला. ईदचं मुहूर्त साधत अभिनेत्याचा सिनेमा प्रदर्शित झाला. पण यावेळी भाईजान प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास अपयशी ठरल्याचं समोर येत आहे. ईदच्या दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली, पण सहाव्या दिवशी सिनेमाच्या कमाईला ब्रेक लागला आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा १०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामिल होण्यासाठी सलमान खान याला विकेन्डची प्रतीक्षा करावी लागणार आहे. २१ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने आतापर्यंत फक्त ९० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. Sacnilk ने जाहिर केलेल्या आकड्यानुसार सिनेमाने सहाव्या दिवशी फक्त ५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सलमान खान याची प्रसिद्धी आणि लोकप्रियता पाहता साहव्या दिवशीचा कमाईचा आकडा फार छोटा आहे. त्यामुळे येत्या काळत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५.८१ कोटींची कमाई केली आहे. मात्र, ईदमुळे सिनेमाच्या कमाईत दुस-या दिवशी वाढ झाली आणि सिनेमाने २५.७५ कोटींची कमाई केली.

रविवारी तिसऱ्या दिवशी ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाने २६.६१ कोटींची कमाई केली. पण सोमवारपासून सिनेमाच्या कमाईत घट झाली. चौथ्या दिवशी सिनेमाने फक्त १०.७१ कोटी कमावले, तर पाचव्या दिवशी ६.१२ कोटींची कमाई केली. त्यामुळे शनिवार, रविवार आल्यामुळे सिनेमा किती कोटींची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा भारतात एकून ४ हजार ५०० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. एवढंच नाही तर, परदेशाच सिनेमा १ हजार २०० प्रदर्शित करण्यात आला आहे. असं असताना देखील सिनेमा समाधानकारक कमाई करु न शकल्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शकांनी निराशा व्यक्त केल्याची चर्चा जोर धरत आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात सलमान खान याने ‘भाईजान’ या भूमिकेला न्याय दिला आहे. सिनेमात सलमान प्रेयसीसाठी गुंडासोबत लढत असल्याचं दिसत आहे. सिनेमात सलमान, अभिनेत्री पूजा हेगडे यांच्यासोबत सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, शहनाज गिल, पलक तिवरी महत्त्वाच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस आले आहेत. सिनेमाला चाहते आणि विश्लेषकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.