जेव्हा शाहरुख खानसोबत घडला मोठा अपघात, थोडक्यात जीव वाचला, किंग खानचा श्वास थांबला आणि…

अपघात झाल्यानंतर थोडक्यात वाचला होता अभिनेता शाहरुख खान याचा जीव, किंग खानचा श्वास थांबला आणि..., घडलेल्या 'त्या' घटनेबद्दल खुद्द किंग खान म्हणाला...

जेव्हा शाहरुख खानसोबत घडला मोठा अपघात, थोडक्यात जीव वाचला, किंग खानचा श्वास थांबला आणि...
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 3:06 PM

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. पण एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करत असताना किंग खान याला अनेक चांगल्या – वाईट गोष्टींचा सामना कराला लागला. पण शहरुख कधीही खचला नाही, त्याने स्वतःचा प्रवास सुरुच ठेवला. शाहरुखने आतापर्यंत असंख्य सिनेमांमध्ये काम केलं. त्याच्या प्रत्येक सिनेमाने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अभिनेत्याच्या वाट्याला अनेकदा अपयश देखील आलं. पण त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. रोमान्सचा बादशहा असणाऱ्या शाहरुखचे अनेक ॲक्शन सीन देखील प्रेक्षकांना आवडले. पण ॲक्शन सीन करताना अभिनेता जखमी देखील झाला. सेटवर झालेल्या अपघाताबद्दल खुद्द शाहरुख खान याने मोठा खुलासा केला.

‘कोयला’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान शाहरुख खान गंभीर जखमी झाला होता. एवढंच नाही तर, अभिनेत्याचा जीव थोडक्यात बचावला होता. सिनेमात एक ॲक्शन सीन करायचा होता. तेव्हा घडलेली घटना खुद्द किंग खान याने सांगितली. शुटिंग दरम्यान अशा दोन घटना घडल्या ज्यामुळे शाहरुख याला स्वतःचे प्राण गमवावे लागले असते. पण थोडक्यात दुर्घटना टळली.

हे सुद्धा वाचा

कोयला सिनेमात शाहरुख ‘शंकर’ या भूमिकेत झळकला होता. सिनेमात एका सीनमध्ये शाहरुखला जोरात धावत यायचं होतं आणि हेलीकॉप्टर त्याचा पाठलाग करत येणार होता. सीनमध्ये हेलीकॉप्टर शाहरुख याच्या डोक्यावरुन जाणार होता आणि अभिनेत्याला खाली पडायचं होतं. पण पायलटच्या चुकीमुळे हेलीकॉप्टर शाहरुखच्या अगदी डोक्यावरुन केला. हेलीकॉप्टर डोक्यावरुन गेल्यामुळे किंग खान खरंच खाली पडला आणि या अपघातात अभिनेत्याचा जीव देखील जावू शकला असता.

एवढंच नाही तर, आणखी एक सीन शूट करत असताना अभिनेत्याचा जीव थोडक्यात बचावला. सिनेमात एक सीनमध्ये शरीराला आग लावल्यानंतर किंग खानला जोरात धावायचं होतं. पण सीन करताना अभिनेत्याच्या शरीराला खंरचं आग लागली. तेव्हा शाहरुखने फायरप्रुफ कपडे घातले होते. शिवाय चेहऱ्यावर वॉटर जेल देखील लावलं होतं.

पण सीन करताना अचानक शारुखला खरंच आग लागली. एका मुलाखतीत या प्रसंगाबद्दल अभिनेता म्हणाला, ‘आग विझत नव्हती म्हणून मी जमीनीवर पडलो. प्रत्येक जण आग विझवण्याच्या प्रयत्नात होते. याचदरम्यान, एका मुलाला वाटलं की, अभिनेत्याच्या चेहऱ्याला आग लागत आहे. त्यामुळे त्याने किंग खानच्या चेहऱ्यावर कार्बन डाईऑक्सायडची फवारणी केली. तेव्हा शाहरुख खानचा श्वासही काही क्षण थांबला होता. तो काळ अभिनेत्यासाठी खूप भीतीदायक होता.’

लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.