लेक अबरामच्या शाळेतील कार्यक्रमात शाहरुखचा खास लूक; गळ्यातल्या नेकलेसनं वेधलं सर्वांचं लक्ष; किंमत वाचून थक्क व्हाल
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात लेक अबरामला प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या शाहरूखचा खास लूक पाहायाला मिळाला, पण त्याहीपेक्षा शाहरूखने गळ्यात घातलेल्या नेकलेसने मात्र सर्वांचं लक्ष वेधलं. या नेकलेसची किंमत जाणून थक्क व्हालं.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नुकताच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहिले होते. आराध्याची अॅक्टींग पाहायला ऐश्वर्या, अभिषेक तसेच अमिताभ बच्चनसुद्धा पोहोचले होते. त्यानंतर शाहरुख खानचा मुलगा अबराम, सैफ अली खान-करीना कपूरचा मुलगा तैमुर या सर्वांचे परफॉर्मन्स पाहायला सर्वजनच पोहोचले होते.
आराध्या आणि अशा अबराम,तैमुर बऱ्याच सेलिब्रिटींच्या मुलांनी स्नेहसंमेलनात खास कला सादर केली. या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आराध्या आणि अबरामने नाताळाच्या थीमवर अभिनय केला. तर तैमुरचा डान्स पाहून करिनाही फार खूश झालेली पाहायला मिळाली.
शाहरुखने केला होता खास लूक
अबराम खानने या ख्रिसमस थीमवर आधारित असलेल्या नाटकात स्नोमॅनची भूमिका साकारली होती. या सेलिब्रिटी किड्सचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले तसेच त्यांची चर्चाही खूप झाली. या व्हिडीओंमध्ये शाहरुखसह गौरी खान, सुहाना खान अबरामला प्रोत्साहन देताना दिसत आहे. दरम्यान या कार्यक्रमाला सर्वच सेलिब्रिटींचा खास लूक पाहायला मिळाला. पण सर्वात जास्त लूकची चर्चा झाली ती शाहरूख खानच्या लूकची.
शाहरुखने गळ्यात घातलेला नेकलेसची चर्चा
View this post on Instagram
शाहरुख खानने गडद निळ्या रंगाचा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. ज्यावर त्याने एक नेकलेस परिधान केला होता. शाहरूखच्या लूकपेक्षाही त्याच्या नेकलेसने सर्वांच लक्ष वेधलं. शाहरुखने गळ्यात घातलेला नेकलेस हर्मीसचा नेकलेस होता.
या नेकलेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या नेकलेसची किंमत जवळपास 63 हजार 829 रुपये इतकी असल्याचं म्हटलं जातं. दरम्यान, शाहरुख खान आपल्या लेकाच्या परफॉर्मन्सचा कौतुकाने व्हिडीओ काढतानाही दिसत आहे.
View this post on Instagram
दरम्यान डिज्नी लाइव्ह अॅक्शनच्या ‘मुफासा: द लायन किंग’ चित्रपटात शाहरूखसह त्याचा 11 वर्षांचा मुलगा अबराम आणि आर्यन खाननेही आवाज दिला आहे. आज, 20 डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 2019 मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेला रीमेक ‘द लायक किंग’ चित्रपटासारखा ‘मुफासा: द लायन किंग’ देखील 10 कोटींची कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे.