83 The Film | रणवीर सिंहच्या ’83’साठी दिग्गजांना मिळालंय भरगोस मानधन, पाहा कोणाला किती पैसे मिळाले…
अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याचा मोस्ट अवेटेड चित्रपट '83' 24 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटात रणवीर भारताचे माजी कर्णधार कपिल देवची (Kapil Sharma) भूमिका बजावत आहे. भारताने 1983 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
मुंबई : अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याचा मोस्ट अवेटेड चित्रपट ’83’ 24 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटात रणवीर भारताचे माजी कर्णधार कपिल देवची (Kapil Sharma) भूमिका बजावत आहे. भारताने 1983 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली लॉर्ड्सच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा पराभव करून विजय मिळवला होता. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे.
या चित्रपटात सुनील गावस्कर यांची भूमिका ताहिर राज भसीन, जतीन सरना यांची भूमिका यशपाल शर्मा, मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेत साकिब सलीम, रवी शास्त्रींच्या भूमिकेत धैर्य करवा, के श्रीकांतच्या भूमिकेत जीवा, मदन लाल यांच्या भूमिकेत हार्डी संधू, बलविंदर सिंग यांच्या भूमिकेत एमी विर्क, संदीप पाटीलच्या भूमिकेत चिराग पाटील, दिलीप वेंगसरकरच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे, कीर्ती आझादच्या भूमिकेत दिनकर शर्मा, रॉजर बिन्नीच्या भूमिकेत निशांत दहिया असे कलाकार दिसणार आहेत. तसेच अभिनेते पंकज त्रिपाठी संघाच्या व्यवस्थापकाची अर्थात पीआर मानसिंग यांची भूमिका साकारत आहेत.
वैयक्तिक गोष्टींसाठी मिळाली मोठी रक्कम!
’83’ चित्रपट रिलीजपूर्वी, त्याच्या निर्मात्यांनी भारतीय खेळाडूंना 15 कोटी दिले असल्याचे कळते. बॉलिवूड हंगामा डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, कपिल देव यांना त्यांची गोष्ट सांगण्यासाठी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत. एका स्रोताने बॉलिवूड हंगामाला सांगितले की, ‘चित्रपट बनवण्यापूर्वी खेळाडूं विषयीचे महत्त्वाचे अधिकार आणि वैयक्तिक कथा मिळवणे महत्त्वाचे आहे. विशेषत:, जेव्हा ते वास्तविक जीवनातील घटनांमधून लोकांभोवती फिरतात. हे लक्षात घेऊन निर्मात्यांनी ‘1983’च्या विश्वचषक विजेत्या संघाला सुमारे 15 कोटी रुपये देऊ केले आहेत. सर्वोच्च रक्कम कपिल देव यांना दिल्याचे समजते.’
‘बुर्ज खलिफा’वर दिसला ट्रेलर!
हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच खूप चर्चेत आहे. आठवडाभरापूर्वी दुबईतील बुर्ज खलिफा येथे ’83’चा ट्रेलर दाखवण्यात आला होता. यावेळी रणवीर, दीपिका पदुकोण आणि कबीर खान देखील उपस्थित होते. रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला. प्रीमियरला रणवीर व्यतिरिक्त, दीपिका पदुकोण, दिग्दर्शक कबीर खान आणि त्यांची पत्नी मिनी माथूर, कपिल देव आणि त्यांची पत्नी रोमीही उपस्थित होते.
हेही वाचा :
Ganapath | अरे देवा! टायगरच्या डोळ्याला काय झालं? ‘गणपत’च्या चित्रिकरणादरम्यान टायगर श्रॉफ जखमी!
चाहत्याच्या लग्नात चक्क सेलिब्रिटींची एण्ट्री, ‘ओम आणि स्वीटू’ जोडीने विवाह सोहळ्याचा आनंद दुणावला!