Aamir Khan Kiran Rao Divorce | पहिल्या पत्नीचं ‘ते’ पत्र वाचून ढसाढसा रडला आमिर खान, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Aamir Khan Kiran Rao Divorce : बॉलिवूड अभिनेता आमिर खानने  (Aamir Khan divorce) त्याची दुसरी पत्नी किरण रावसोबत (Kiran Rao) 15 वर्षांनी घटस्फोट घेतला. दोघांनी  संयुक्त निवेदन जारी करुन विभक्त होत असल्याचं जाहीर केलं.

Aamir Khan Kiran Rao Divorce | पहिल्या पत्नीचं ‘ते’ पत्र वाचून ढसाढसा रडला आमिर खान, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
आमीर खान-रीना
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 12:37 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानने  (Aamir Khan divorce) त्याची दुसरी पत्नी किरण रावसोबत (Kiran Rao) 15 वर्षांनी घटस्फोट घेतला. दोघांनी  संयुक्त निवेदन जारी करुन विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. आमिर खान-किरण रावच्या घटस्फोटाच्या वृत्ताने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दोघांनी सहमतीने वेगळे होत असल्याचं म्हटलं आहे.

आमिर खानने पहिली पत्नी रिनासोबत काडीमोड घेऊन किरण रावसोबत लगीनकाठ बांधली होती. लगान सिनेमावेळी आमिर आणि किरण रावचं सुत जुळलं होतं. नुकतंच लगान सिनेमाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने आमिरने पहिली पत्नी रिनाची आठवण सांगितली होती.

बॉलिवूड अभिनेता आमीर खान (Aamir Khan) अभिनित ‘लगान’ (Lagaan) या चित्रपटाने 20 वर्षांपूर्वी यशाचे झेंडे फडकावले होते. या भव्य चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर होते. या चित्रपटासाठी आशुतोष आणि आमीर यांना ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’ साठी ऑस्कर नामांकनही मिळालं. हा चित्रपट ऑस्कर जिंकू शकला नसला, तरी इतर सर्व पुरस्कार या चित्रपटाने जिंकले होते (20 years of Lagaan Aamir Khan cried after reading a letter from Ex wife Reena).

‘लगान’ हा तोच चित्रपट होता, ज्याच्या शूटिंगदरम्यान आमीर पत्नी किरण राव (Jiran Rao) हिच्या जवळ आला होता. या चित्रपटात किरण रावने सहाय्यक म्हणून काम केले होते. माध्यम वृत्तानुसार, आमीर खान म्हणतो की, चित्रपटाशी संबंधित बर्‍याच आठवणी नेहमी त्याच्यासोबत असतात. पण, सर्वात खास क्षण म्हणजे या चित्रपटानंतर जेव्हा त्याला पहिली पत्नी रीना (Reena) यांचे पत्र आले.

आमीरच्या म्हणण्यानुसार, एका रात्री मी तिला सांगितले की, तू माझ्यासाठी हा चित्रपट बनवावा. मग तिने त्यास नकार दिला, जे पूर्णपणे बरोबर होते. पण, आमीरसाठी रीनाने प्रॉडक्शन वर्क केले होते आणि त्यासाठी तिने खास तयारी देखील केली होती. यासाठी रीना सुभाष घई सारख्या लोकांना भेटली होती.

आमीरसाठी रीनाने केले ‘हे’ काम

आमीरच्या म्हणण्यानुसार रीना खूप मेहनतीने मेकिंगच्या गोष्टी शिकली होती, ती खूप स्ट्रीक्ट निर्माती होती, सर्वांना अतिशय धाकात वागवायची. माझ्यावरही ती ओरडायची. जेव्हा हा चित्रपट पूर्ण झाला तेव्हा रीनाने एक पत्र लिहिले होते. मात्र माला आता ते संपूर्ण पत्र आठवत नाही, पण त्यात तिने अशा कठीण परिस्थितीत चित्रपट बनवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि आपल्या आरडाओरडीबद्दलही सांगितले होते.  ते पत्र आम्हा सगळ्यानांच खूप भावूक करणारे होते. आम्ही सर्व चित्रपट क्षेत्रातील होतो, पण चित्रपटाची पार्श्वभूमी नसलेल्या तिने जे काही केले ते अतिशय कठीण होते. मी ते पत्र वाचून खूप रडलो होतो.

आजपर्यंत कोणताही चित्रपट ‘लगान’ची उत्तम कथा, संगीत, बॅकग्राउंड स्कोअरसह स्पर्धा करू शकलेला नाही. आजपर्यंत याचे रेकॉर्ड मोडता आलेले नाही. आमिर खान प्रॉडक्शनच्या पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धडक दिली. तथापि, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमीर खान आणि किरण राव एकमेकांच्या जवळ आले आणि आमीरने रीनाला घटस्फोट देऊन किरण रावशी लग्न केले.

(20 years of Lagaan Aamir Khan cried after reading a letter from Ex wife Reena)

हेही वाचा :

Photo : ‘काटा लगा’गर्ल शेफाली जारीवालाचा हॉट अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर

Video | ‘या’ लोकप्रिय मराठी गाण्यात दिसला होता ‘दया बेन’चा बोल्ड लूक, तुम्ही पाहिलंत का?

देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.