‘83’ Box Office Collection Day 7 : रणवीर सिंहच्या चित्रपटाने जगभरात केले सर्वोत्तम कलेक्शन, जाणून घ्या किती कमाई केली?

रणवीर सिंहचा '83' हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक होता. चित्रपट ख्रिसमसच्या वेळी प्रदर्शित झाला, जी चित्रपटासाठी सर्वात आदर्श रिलीज तारीख मानली जाते. रिलीजनंतर चित्रपटाची सुरुवात चांगली झाली पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्याच्या कलेक्शनवर परिणाम झाला.

‘83’ Box Office Collection Day 7 : रणवीर सिंहच्या चित्रपटाने जगभरात केले सर्वोत्तम कलेक्शन, जाणून घ्या किती कमाई केली?
Ranveer Singh
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 12:38 PM

मुंबई : रणवीर सिंहचा ’83’ हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक होता. चित्रपट ख्रिसमसच्या वेळी प्रदर्शित झाला, जी चित्रपटासाठी सर्वात आदर्श रिलीज तारीख मानली जाते. रिलीजनंतर चित्रपटाची सुरुवात चांगली झाली पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्याच्या कलेक्शनवर परिणाम झाला. पण, या चित्रपटासाठी चांगली बातमी म्हणजे हा चित्रपट जगभरात चांगला व्यवसाय करत आहे. सातव्या दिवशीही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने जगभरात 115 कोटींची कमाई केली आहे.

1983च्या वर्ल्ड कपवर आधारित या चित्रपटाकडून सगळ्यांना खूप आशा होत्या. पण, या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे व्यवसाय केला नाही, या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे 66.66 कोटींचा व्यवसाय केला आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये अनुक्रमे 12.64 कोटी, 16.95 कोटी आणि 17.41 कोटींची कमाई केली. ही कमाई हळूहळू वाढत गेली. या चित्रपटाच्या भारतीय कमाईचा आकडा 100 कोटींच्या जवळपास जाणे कठीण आहे.

व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांच्या मते, रणवीरच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 25.16 कोटी, दुसऱ्या दिवशी 29.41 कोटी, वर्ल्डवाईड वीकडेजमध्ये तिसर्‍या दिवशी 29.64 कोटी कमावले. यासह, एका आठवड्यात एकूण 115.17 कोटींची कमाई करून मोठा आकडा गाठला आहे. कोरोनामुळे या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला आहे. यासोबतच दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा’ आणि ‘स्पायडरमॅन’लाही तगडी स्पर्धा मिळाली आहे.

चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन

या चित्रपटाच्या संपूर्ण प्रमोशनदरम्यान, मोठे खेळाडू आणि अभिनेते या चित्रपटाशी जोडले गेले होते. या चित्रपटात अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत, ज्यांनी 1983 च्या विश्वचषकात सहभागी झालेल्या खेळाडूंची भूमिका साकारली आहे. रणवीर सिंग, हार्डी संधू, ताहिर भसीन, एमी विर्क, साकिब सलीम, चिराग पाटील, धैर्य करवा, जतिन सरना हे प्रमुख आहेत. याशिवाय पंकज त्रिपाठी आणि बोमन इराणी हे देखील या चित्रपटात आहेत. यामध्ये दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. ती कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली आहे. हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 रोजी हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा :

RRR Movie Release | ओमिक्रॉन-कोरोनाचं संकट तरीही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार ‘RRR’, निर्मात्यांचा मोठा निर्णय!

Shilpa Shirodkar | सगळ्यात पहिली ‘लसवंत’ अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह! शिल्पा शिरोडकर विषाणूच्या विळख्यात!

अभिनेत्री पूजा सावंत, चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव पुरस्कार; मंत्री जयंत पाटलांच्या हस्ते नाशिकमध्ये होणार सन्मान

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.