Sonu Sood IT Raid | बिहारच्या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या खात्यात 960 कोटी रुपये ट्रान्स्फर! सोनू सूद प्रकरणाशी कनेक्शन?
बिहारमध्ये दोन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अचानक 960 कोटी रुपये जमा झाल्याच्या प्रकरणानंतर बराच गदारोळ झाला होता. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील आजमनगरमधील पास्टिया गावातील दोन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये अचानक 960 कोटी रुपये जमा झाले.
मुंबई : बिहारमध्ये दोन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अचानक 960 कोटी रुपये जमा झाल्याच्या प्रकरणानंतर बराच गदारोळ झाला होता. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील आजमनगरमधील पास्टिया गावातील दोन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये अचानक 960 कोटी रुपये जमा झाले. गुरुचरण विश्वास आणि असित कुमार 15 सप्टेंबर रोजी त्यांच्या इंडसइंड बँक खात्याची तपासणी करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना याची माहिती मिळाली. त्याचवेळी आयकर विभागाने शेकडो किलोमीटर अंतरावरील मुंबईतील अभिनेता सोनू सूदच्या (Sonu Sood) घरावर छापा टाकला होता.
बिहारच्या कटिहारमध्ये राहणारे दोन विद्यार्थी जेव्हा इंडसइंड बँकेच्या लोकसेवा केंद्रात गेले आणि त्यांची खाती तपासली, तेव्हा त्यांना आढळले की स्पाइस मनी कंपनीच्या पोर्टलचा वापर त्यांच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला जात आहे. अभिनेता सोनू सूद या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या कंपनीत सोनू सूदची मोठी भूमिका आहे. म्हणूनच प्रश्न निर्माण झाला आहे की, सोनू सूदचा मुंबईपासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या कटिहारच्या बँक खात्याच्या व्यवहाराशी काही संबंध आहे का? या संपूर्ण प्रकरणात जिल्हा दंडाधिकारी उदयन मिश्रा यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
सायबर गुन्ह्याशी संबंधित प्रकरण असल्याचा संशय
दोन्ही विद्यार्थ्यांच्या खात्यात अचानक झालेल्या या व्यवहारामध्ये सायबर क्राईमशी संबंधित प्रकरण असल्याचे, अशी शंका बँक व्यवस्थापक एम के मधुकर यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणी बँकेने स्पष्टीकरणही दिले आहे. आता इंडसइंड बँकेशी संबंधित लोकांचीही चौकशीमध्ये चौकशी केली जात आहे. मात्र, सध्या हे प्रकरण सोनू सूदशी संबंधित असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.
सोनू सूदचा रिच ग्रुपशीही संबंध
दरम्यान, सोनू सूदची कानपूरच्या रिच ग्रुपशी कनेक्शन मिळण्याची चर्चा ऐरणीवर आली आहे. जिथे असे म्हटले जात आहे की, सोनू सूदवर बनावट कर्ज घेऊन पैसे गुंतवण्याचे प्रकरण समोर आले आहे. आयकर विभागाचे अधिकारी रिच ग्रुपच्या परिसरात सतत छापे घालत आहेत. अशा स्थितीत सोनू सूदशी संबंधित आर्थिक तपास देखील सध्या जोरात सुरू आहे. या छापे दरम्यान, आयकर विभागाला बोगस पावत्या देण्याचे आणि ते विकण्याचे संकेत मिळाले आहेत आणि कंपनीने संचालक म्हणून स्वतःच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचाही पर्दाफाश केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीमध्ये तीन भाऊ आहेत, ज्यांची नावे तात्वेश अग्रवाल, आशेश अग्रवाल आणि शाश्वत अग्रवाल आहेत. छापे दरम्यान, आयकर टीमला कळले आहे की आणखी 15 कंपन्या देखील त्याच्याशी संबंधित आहेत. जे पूर्णपणे बनावट आहेत.