Kareena Kapoor | करीना कपूर हिचा युजर्सने लावला क्लास, थेट विचारला हा मोठा प्रश्न, चॅट शोमध्ये
बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही कायमच चर्चेत असते. करीना कपूर आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून करीना कपूर ही तिच्या चॅट शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक बाॅलिवूड स्टारने हजेरी लावलीये.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चॅट शोमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी करीना कपूर हिच्या या शोमध्ये बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा पोहचला होता. यावेळी रणबीर कपूर याने काही मोठे खुलासेही केले. यावेळी करीना कपूर आणि रणबीर कपूर हे करण जोहरबद्दल बोलताना दिसले. इतकेच नाहीतर करीना कपूर थेट म्हणाली की, आपले नाव हे करण जोहर याच्यामुळे खराब होत आहे. करीना कपूर आणि रणबीर कपूर यांचे हे बोलणे ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला. या शोमध्ये करीना कपूर ही तिच्या कुटुंबियांपैकी किंवा मित्रांपैकीच लोकांना बोलावते.
करीना कपूर हिच्या व्हाट वीमेन वांट या शोचे हे चौथे सीजन सुरू आहे. नुकताच करीना कपूर हिने यूट्यूबवर तिच्या शोशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यावेळी चाहत्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. विशेष म्हणजे चाहत्यांच्या जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरे देताना करीना कपूर ही दिसली. यावेळी करीनाने मोठे भाष्य देखील केले आहे.
बऱ्याच युजर्सने करीना कपूर हिला विचारले की, तु तुझ्या चॅट शोमध्ये एकतर तुझ्या कुटुंबियांपैकी कोणाला नाहीतर तुझ्या जवळच्या मित्रांनाच बोलावते, इतर बाकी कोणालाही तू कधीच बोलावत नाही? यावर करीना कपूर हिने अत्यंत खास उत्तर दिले आहे. करीना कपूर म्हणाली की, माझ्या शोमध्ये माझे कुटुंबिय किंवा माझे मित्रच येतात. कारण चाहते आम्हाला बोलताना बघू इच्छितात…
पुढे करीना कपूर म्हणाली की, लोकांना माझ्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबाबद्दल खूप जास्त आवड आहे. लोकांना आम्हाला बोलतांना पाहायचे आहे आणि आम्ही कशाबद्दल बोलतो हे देखील त्यांना जाणून घ्यायचे आहे आणि लोकांना आमचे विचार ऐकायला आवडतात. म्हणूनच माझ्या शोमध्ये माझे कुटुंबिय आणि मित्र येतात.
अनेकांनी करीना कपूर हिला म्हटले की, तुझा चॅट शो हा हिंदीमध्ये आहे, परंतू शोमध्ये अनेकदा तुला हिंदी बोलताना समस्या येतात, बऱ्याच वेळा तू चुकीची हिंदी बोलते. मात्र, चित्रपटांमध्ये तर तुझी हिंदी आणि डायलॉग्स जबरदस्त असतात. यावर उत्तर देताना करीना कपूर म्हणाली की, चित्रपटांमध्ये हिंदीतील डायलॉग्स बोलण्यासाठी आणि त्याची तयारी करण्यासाठी वेळ मिळतो. शोमध्ये तसे होत नाही.
पुढे करीना कपूर म्हणाली, डायलॉग शिकण्यासाठी खूप वेळ तुमच्याकडे असतो. मात्र, शोमध्ये तो वेळ तुम्हाला मिळत नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा चुका होतात. करीना कपूर हिच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वी तिचा पती सैफ अली खान हा देखील आला होता. इतकेच नाहीतर सारा अली खान ही देखील करीना कपूर हिच्या शोमध्ये पोहचली होती.