Shraddha Kapoor | कियारा, स्वरा भास्कर यांच्यानंतर आता ‘श्रद्धा कपूर’ही या महिन्यात अडकणार लग्न बंधनात? स्वत: अभिनेत्रीने केला खुलासा
श्रद्धा कपूर ही तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणबीर कपूर याच्यासोबत पहिल्यांदाच सोबत काम करताना श्रद्धा कपूर ही दिसणार आहे. हे दोघे आता काय धमाका करतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी तू झूठी मैं मक्कार या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये पहिल्यांदा रणबीर कपूर याच्यासोबत श्रद्धा कपूर ही स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे तब्बल तीन वर्षांपासून श्रद्धा कपूर ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. बागी या चित्रपटामध्ये शेवटी श्रद्धा कपूर ही दिसली होती. श्रद्धा कपूर कायमच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धा कपूर आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाच्या माध्यमातून श्रद्धा कपूर तीन वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे.
श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांच्या तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. हा चित्रपट होळीच्या दिवशी 8 मार्च रोजी रिलीज होतोय. विशेष म्हणजे फक्त श्रद्धा कपूर हिच नाहीतर रणबीर कपूरही या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर ही खोटे बोलताना दिसणार आहे.
तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रणबीर कपूर याने थेट पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा जाहिर केली होती. मात्र, टिका होत असल्याचे लक्षात येताच त्याने आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला गेल्याचे म्हटले आणि देशाच्या पुढे कोणतीच कला मोठी नसल्याचे देखील म्हटले. माझ्यासाठी देश सर्वात अगोदर असल्याचेही रणबीर म्हणताना दिसला.
तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाचे प्रमोशन करताना श्रद्धा कपूर दिसली. यावेळी तिने अनेक प्रश्नांना उत्तरे देत फुल धमाल देखील केली. यावेळी श्रद्धा कपूर हिला विचारण्यात आले की, तीन वर्ष तू कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. नेमकी तू कुठे बिझी होती, म्हणजे लग्नाची तयारी वगैरे करत होती का?
यावर श्रद्धा कपूर म्हणाली की, होय खरे आहे, तुम्हाला माहिती नाहीये का? पुढच्या महिन्यात माझे लग्न आहे आणि मी लग्नाचीच तयारी करण्यामध्ये बिझी होते. मी पुढच्या महिन्यात लग्न करणार हे तुम्हाला अजून कसे समजले नाहीये? मात्र, हे सर्व बोलताना श्रद्धा कपूर हसताना देखील दिसलीये. यावरून कळाले की, श्रद्धा कपूर ही फक्त मजाक करत होती. आता श्रद्धा कपूर हिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे आणि चाहते खरोखरच पुढच्या महिन्यात तू लग्न करणार का हा प्रश्न विचारत आहेत.