मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्यावर तयार होणार बाॅलिवूड चित्रपट, निर्मात्यांनी घेतला हा निर्णय
मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर याच्यासोबतच बाॅलिवूडच्या काही अभिनेत्रींचे नाव आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. या प्रकरणात अभिनेत्रींची चाैकशी देखील अनेक वेळा झालीये. आता या प्रकरणातील मोठे अपडेट पुढे आले आहे.
मुंबई : सुकेश चंद्रशेखर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी हा सुकेश चंद्रशेखर (Sukesh chandrasekhar) आहे. सुकेश चंद्रशेखर याने अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींना महागडे गिफ्ट देखील दिले आहेत. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिचे पाय खोलात असल्याचे कळते. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिची चाैकशी अनेकदा करण्यात आलीये. जॅकलिन फर्नांडिस ही सुकेश चंद्रशेखर याच्या प्रेमात इतकी जास्त आंधळी झाली होती की, तिला सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत लग्न करायचे होते.
जॅकलिन फर्नांडिस हिच नाहीतर नोरा फतेही देखील सुकेश चंद्रशेखर याच्या संपर्कात होती. नोरा फतेही हिला देखील सुकेश चंद्रशेखर याने महागडे गिफ्ट दिले आहेत. मात्र, हे सर्व आरोप खोटे असल्याचे नोरा फतेही हिने म्हटले. मात्र, जॅकलिन फर्नांडिस हिच्यासोबतच नोरा फतेही हिचे नाव देखील या प्रकरणात सतत येत आहे. नोरा फतेही हिची देखील चाैकशी करण्यात आलीये.
आता सुकेश चंद्रशेखर याच्याबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे. आता चक्क सुकेश चंद्रशेखर याच्यावर एक बाॅलिवूड चित्रपट तयार होणार आहे. ज्याचे कामही सुरू करण्यात आलंय. चित्रपट निर्माते आनंद कुमार हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. सध्या चित्रपटाच्या स्क्रीप्टचे काम सुरू असल्याचे सांगितले जातंय.
आनंद कुमार यांनी स्क्रीप्टसाठी जेलच्या अधिकाऱ्यांसोबत देखील संपर्क केलाय. चित्रपटासाठी ते अधिकाऱ्यांकडून काही महत्वाची माहिती घेणार आहेत. चित्रपटामध्ये सुकेश चंद्रशेखर याच्या पर्सनल लाईफपासून मनी लाँड्रिंगपर्यंत सर्वकाही दाखवले जाईल. कशाप्रकारे त्याने श्रीमंत लोकांची फसवणूक केलीये.
विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये दोन अजून महत्वाचे पात्र असणार आहेत. जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही या. जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांचे पात्र चित्रपटात नेमके कोण साकारणार याबद्दल अजूनतरी काही खुलासा झाला नाहीये. या चित्रपटामध्ये सुकेश चंद्रशेखर हा जेलमध्ये कशाप्रकारचे आयुष्य जगतोय हे देखील दाखवले जाणार.
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेही हिच्यावर देखील गंभीर आरोप केले जात आहेत. होळीनिमित्त एक खास पत्र सुकेश चंद्रशेखर याने जेलमधून जॅकलिन फर्नांडिस हिच्यासाठी लिहिले होते, या पत्राची चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसली.