Vicky Kaushal | एका बोल्टने केली मोठी गडबड! विकी कौशल कायद्याच्या कचाट्यात अडकता अडकता वाचला!
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) त्याच्या आगामी चित्रपटामुळे कायदेशीर अडचणीत सापडला होता. इंदूरमध्ये सुरू असलेल्या त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमधून काही छायाचित्रे समोर आली आहेत. यामध्ये तो सारा अली खानसोबत इंदूरच्या रस्त्यावर बाईक चालवताना दिसला होता.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) त्याच्या आगामी चित्रपटामुळे कायदेशीर अडचणीत सापडला होता. इंदूरमध्ये सुरू असलेल्या त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमधून काही छायाचित्रे समोर आली आहेत. यामध्ये तो सारा अली खानसोबत इंदूरच्या रस्त्यावर बाईक चालवताना दिसला होता. या फोटोमध्ये दिसणाऱ्या बाईकमुळे एका व्यक्तीने विकी कौशलविरोधात तक्रार दाखल केली होती.
या व्यक्तीने विकी कौशल याच्यावर वाहन क्रमांक चोरल्याचा आरोप केला होता. जयसिंग यादव नावाच्या तक्रारदाराने सांगितले की, “चित्रपटाच्या सीक्वेन्समध्ये वापरलेला वाहन क्रमांक माझा आहे. चित्रपट युनिटला याची माहिती आहे की, नाही हे माहित नाही. मात्र, ते वैध नाही, परवानगीशिवाय ते माझी नंबर प्लेट वापरू शकत नाहीत. मी याबाबत निवेदन दिले असून, याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे.”
View this post on Instagram
बोल्टमुळे गैरसमज झाला!
यानंतर बाणगंगा उपनिरीक्षक राजेंद्र सोनी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. आता तपास केल्यानंतर एसआयने तक्रारदाराचा गैरसमज दूर केला आहे. ते म्हणाले- ‘नंबर प्लेट तपासताना आम्हाला आढळले की, हा सर्व गैरसमज नंबर प्लेटवरील फिक्स बोल्टमुळे झाला आहे. त्या बोल्टमुळे तो क्रमांक एक ऐवजी चार क्रमांकासारखा दिसत होता. तर मूव्ही सीक्वेन्समध्ये वापरलेला नंबर हा चित्रपट निर्मिती टीममधीलच आहे. त्यामुळे तपासादरम्यान आम्हाला काहीही बेकायदेशीर आढळले नाही.’
त्याचवेळी पोलिसांसोबतच प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित एका व्यक्तीनेही बाईकची नंबर प्लेट टीममधील सदस्याची असल्याचे सांगितले आहे. नंबर प्लेट लावण्यासाठी बोल्टचा वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. ही नंबर प्लेट केवळ प्रोडक्शन हाऊसच्या सदस्याची आहे. प्रोडक्शन हाऊसच्या एका सदस्याने एएनआयला असेही सांगितले होते की नंबर प्लेट्स बसवण्यासाठी बोल्टचा वापर केला जातो. आता या प्रकरणाच्या तपासात विकी निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे.
हेही वाचा :
स्वप्नील जोशीने नवीन वर्षातील नवीन चित्रपटाची केली घोषणा, ‘अश्वत्थ’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!
जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियादेखील कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!
Khatija | वाढदिवशीच खातिजा अडकली खास नात्यात!, पाहा कोण आहे ए आर रहमानचा होणारा जावई Riyasdeen?
नवविवाहित अंकिता लोखंडेच्या बॅकलेस मादक लूकने केलं घायाळ, पाहा नवऱ्यासोबतचे खास रोमँटिक PHOTOS
Devon Ke Dev–Mahadev फेम मोहित रैनानं गुपचूप उरकलं लग्न, चाहत्यांना दिलं सरप्राइज