Video | तब्बल 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास करून चाहता सोनू सूदच्या भेटीला, पाहा अभिनेत्याने कसे केले स्वागत…

बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) लॉकडाऊनमध्ये लोकांना खूप मदत केली आहे. जिथे आता त्याच्या चाहत्यांनी त्याची देवाप्रमाणेच पूजा करण्यास सुरुवात केली आहे. लोकांमध्ये त्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.

Video | तब्बल 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास करून चाहता सोनू सूदच्या भेटीला, पाहा अभिनेत्याने कसे केले स्वागत...
सोनू सूद
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 11:30 AM

मुंबई : बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) लॉकडाऊनमध्ये लोकांना खूप मदत केली आहे. जिथे आता त्याच्या चाहत्यांनी त्याची देवाप्रमाणेच पूजा करण्यास सुरुवात केली आहे. लोकांमध्ये त्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. जिथे आज एक चाहता अभिनेत्याला भेटण्यासाठी 1200 किमी सायकल चालवून मुंबईला पोहोचला आहे. या व्यक्तीने त्याच्या सायकलवर सोनू सूदचा एक मोठा फोटो लावला होता. बरेच हार आणि फुलं घेऊन हा व्यक्ती सोनू सूदकडे पोहोचला होता. ही सगळी फुलं आणि हर त्याने आपल्या वतीने सोनू सूदला अर्पण केले.

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून, सोनू सूदने अद्याप त्यांच्या मदतीची प्रक्रिया थांबवली नाही हे लक्षात येते. अभिनेता सोनू सूड सतत लोकांना मदत करत असतो. यामुळेच लोक त्याला भेटायला दूरवरून येत असतात. सोनू सूद या व्यक्तीला पाहताच तो खूप भावूक झाला. सायकलवर आलेल्या या व्यक्तीने चप्पलही घातलेली नव्हती. हे पाहून सोनू सूदने या व्यक्तीसाठी नवीन चप्पलची व्यवस्था केली.

सोनूची भेट घेतल्यानंतर या व्यक्तीने त्याच्या पायावर फुले अर्पण केली, पण इथे सोनू सूद याने स्वत: त्या चाहत्याला पुष्पहार गतला आणि म्हणाला की, हे सर्व करण्याची गरज नाही. सोनूने हात जोडून त्याचे स्वागत केले. सोनू सूदला भेटण्यासाठी लोक कैक किलोमीटरवरुन सतत येत असतात. यापूर्वी एका व्यक्तीने अभिनेत्याला भेटण्यासाठी 700 किमीचा प्रवास केला होता.

पाहा सोनू सूदचा हा खास व्हिडीओ

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या दरम्यान सोनू सूद यांनी देशात बर्‍याच ठिकाणी ऑक्सिजन प्लांट स्थापित करण्याची घोषणा केली होती. ज्यानंतर अभिनेत्यानेही आपल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे काम सुरू केले आहे. अलीकडेच सोनू सूद यांनी आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे पहिला ऑक्सिजन प्लांट स्थापित केला आहे. या संपूर्ण प्लांटचा सेटअप स्वत: सोनू सूद याने केला आहे. अभिनेत्याने सर्वांचीच खूप मदत केली, कोण श्रीमंत आहे आणि गरीब कोण हेदेखील पाहिले नाही. म्हणूनच त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

(A Fan traveled 1200 km on cycle to meet Sonu Sood)

हेही वाचा :

घरातून केवळ 500 घेऊन स्वप्न पुरी करायला निघालेला रवी किशन, आजमितीला कामातोय कोटींचा गल्ला!

‘समांतर 2’ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद, अवघ्या 15 दिवसांत 56 दशलक्षहूनही अधिक व्ह्यूज!

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.