नवाझुद्दीन सिद्दीकी याने दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर सुनावणी, मुलांबाबत केला मोठा दावा

नवाझुद्दीन सिद्दीकी याने दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडलीये. गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू आहे.

नवाझुद्दीन सिद्दीकी याने दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर सुनावणी, मुलांबाबत केला मोठा दावा
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 9:07 PM

ब्रिजभान जैसवार, मुंबई : नवाझुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या पत्नीमधील वाद वाढताना दिसत आहे. या वादामुळे नवाझुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याच्या अडचणी देखील वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीन सिद्दीकी याची पत्नी त्याच्यावर सतत गंभीर आरोप करताना दिसत आहे. हा वाद कोर्टामध्ये पोहचला असून दररोज मोठे दावे देखील केले जात आहे. एक व्हिडीओ शेअर करत आलिया सिद्दीकी हिने नवाझुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप (Serious charges) केले. नवाझुद्दीन सिद्दीकी याने दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडलीये. गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू आहे. अभिनेत्याची पत्नी त्याच्यावर गंभीर आरोप करत आहे.

नवाझुद्दीन सिद्दीकी याने हेबियस कॉर्पस याचिका पत्नीकडे असलेल्या मुलांचा ठावठिकाण समजावा म्हणुन दाखल केलीये. याच याचिकेवर नुकताच सुनावणी देखील झाली. नवाझुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आणि मुले दुबईचे नागरिक असून अभिनेत्याच्या मुलांना दुबईतील शाळेत घालण्यात आले होते.

गेल्या काही वर्षांपासून नवाझुद्दीन सिद्दीकी याचे मुले भारतामध्ये असून शाळेत ते गैरहजर आहेत. दोन्ही मुले त्यांच्याकडे असून मुलगी ही आईकडेच राहणार असल्याचे आणि परदेशातील शाळेत शिक्षण घेण्यावर ठाम आहे, असा दावा वकिल रिझवान मर्चंट यांनी केला आहे.

या सुनावणीमध्ये शाळामध्येच सोडल्यास शिक्षण कसे होईल, असा सवाल कोर्टाने केला आहे. शिक्षण ऑनलाईन पद्धतीने होईल आणि जर शाळेने तसं करण्यास मज्जाव केल्यास मुलांना शाळेत घातलं जाईल, असे वकिल मर्चंट यांनी म्हटले आहे. सुनावणीच्या वेळी मुलांशी बोलू देण्याची मागणी केली असता आम्ही अडवल नसल्याचे आलियाच्या वकिलांनी कोर्टात स्पष्ट केले.

आपसात बोलून मुलांच्या भेटीबाबत एका निष्कर्षावर पोहोचण्याचा सल्ला देत कोर्टाने पुढच्या आठवड्यापर्यंत याचिका तहकूब केली आहे. नवाझुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या पत्नीपासून 2011 साली वेगळा झाला असून त्यांच्यातील खुलानामा झाला असल्याचा सिद्दीकीच्या वकीलाकडून कोर्टात सांगण्यात आलं.

गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीन सिद्दीकी याच्या खाजगी आयुष्यात मोठे वादळ आले असून त्याची पत्नी त्याच्यावर सतत आरोप करत आहे. काही दिवसांपूर्वी आलिया सिद्दीकी हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये नवाझुद्दीन सिद्दीकी हा गेटसमोर उभा असून एकदम हतबल दिसत होता. नवाझुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणी सतत वाढताना दिसत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.