सुपरस्टार महेश बाबू यांच्यावर दु: खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे झाले निधन…

2022 मध्ये महेश बाबू यांच्या जवळील ही दुसरी व्यक्ती त्यांच्यापासून दूर गेल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सुपरस्टार महेश बाबू यांच्यावर दु: खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे झाले निधन...
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 10:44 AM

मुंबई : सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. महेश बाबू यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. रिपोर्टनुसार गेल्या काही दिवसांपासून महेश बाबू यांच्या आईची (Mother) तब्येत खराब होती. त्यांच्यावर हैद्राबाद येथील रूग्णालयात उपचार (Treatment) सुरू होता. त्यांची तब्येत अधिक खराब झाल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मावळली आहे. पहाटे 4 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

माहितीनुसार, इंदिरा देवी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी पद्मालय स्टुडिओत आणले गेले आहे. हैद्राबाद येथील ज्युबिली हिल्स येथील महाप्रस्थानम येथे साधारण 12 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

2022 मध्ये महेश बाबू यांच्या जवळील ही दुसरी व्यक्ती त्यांच्यापासून दूर गेल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 2022 च्या सुरूवातीला महेश बाबू यांचे बंधू रमेश बाबू यांचे निधन झाले होते, त्यानंतर आता आईचे निधन झाले आहे.

महेश बाबू यांच्या कुटुंबीयांनी इंदिरा देवी यांच्या निधनाची बातमी दिलीये. निवेदनामध्ये म्हटले आहे की, ज्येष्ठ अभिनेते कृष्णा यांच्या पत्नी आणि महेश बाबू यांच्या आई इंदिरा देवी यांचे निधन झाले आहे. इंदिरा देवी गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आज पहाटे त्यांचे निधन झाले आहे.

आईची तब्येत खराब असल्याने गेल्या काही दिवसांपासून महेश बाबू देखील हैद्राबादमध्येच होते. आज सकाळी आजचे निधन झाल्याचे समजल्यावर महेश बाबू यांच्यावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. आज हैद्राबाद येथे इंदिरा देवींवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.