Video | ‘टायगर 3’च्या सेटवरील व्हिडीओ लीक? इमरान हाश्मी आणि कतरिना कैफ दिसले खास लूकमध्ये

सलमान खान याच्या टायगर 3 चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. आता या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये इमरान हाश्मी हा दिसत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना आवडलाय.

Video | 'टायगर 3'च्या सेटवरील व्हिडीओ लीक? इमरान हाश्मी आणि कतरिना कैफ दिसले खास लूकमध्ये
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 3:34 PM

मुंबई : बालिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या टायगर 3 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे सलमान खान याचे चाहते त्याच्या टायगर 3 चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात आहेत. या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा देखील आहेत. या चित्रपटामध्ये इमरान हाश्मी (Emraan Hashmi) देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान कमाई केल्याने सलमान खान याचा चित्रपट (Movie) बाॅक्स आॅफिसवर धमाका करेल, अशी अपेक्षा आहे. टायगर 3 चित्रपटाच्या अगोदर सलमान खान हा किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

किसी का भाई किसी की जान हा चित्रपट 2023 मध्ये ईदच्या दिवशी रिलीज होतोय. शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटामध्येही चाहत्यांना सलमान खान याची झलक पाहण्यास मिळाली. पठाणचा जीव धोक्यात असताना त्याला वाचवण्यासाठी सलमान खान धावून आल्याचे चित्रपटामध्ये दाखवण्यात आले.

टायगर 3 चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटवर चाहत्यांच्या बारीक नजरा आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे आणि तो व्हिडीओ टायगर 3 चित्रपटाच्या सेटवरील असल्याचा दावा देखील केला जातोय. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये इमरान हाश्मी देखील दिसतोय. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये इमरान हाश्मासोबत एक महिला दिसत आहे, ती कतरिना असल्याचा दावा केला जातोय. सलमान खान आणि कतरिना कैफ यांना स्क्रीन शेअर करताना पाहण्यास चाहते इच्छुक आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये इमरान हाश्मी याचा खास लूक दिसतोय.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, चित्रपटामधील महत्वाच्या सीनचे शूटिंग सुरू आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह बघायला मिळतोय. या व्हिडीओ चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

सलमान खान याचा चित्रपट किसी का भाई किसी की जान याच्यामधील बिल्ली बिल्ली हे गाणे आज रिलीज झाले आहे. यापूर्वी चित्रपटातील एक गाणे रिलीज करण्यात आले होते. विशेष म्हणजे चित्रपटातील गाण्यांना चाहत्यांचे मोठे प्रेम मिळताना दिसत आहे. हे गाणे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.