मुंबई : बालिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या टायगर 3 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे सलमान खान याचे चाहते त्याच्या टायगर 3 चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात आहेत. या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा देखील आहेत. या चित्रपटामध्ये इमरान हाश्मी (Emraan Hashmi) देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान कमाई केल्याने सलमान खान याचा चित्रपट (Movie) बाॅक्स आॅफिसवर धमाका करेल, अशी अपेक्षा आहे. टायगर 3 चित्रपटाच्या अगोदर सलमान खान हा किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
किसी का भाई किसी की जान हा चित्रपट 2023 मध्ये ईदच्या दिवशी रिलीज होतोय. शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटामध्येही चाहत्यांना सलमान खान याची झलक पाहण्यास मिळाली. पठाणचा जीव धोक्यात असताना त्याला वाचवण्यासाठी सलमान खान धावून आल्याचे चित्रपटामध्ये दाखवण्यात आले.
टायगर 3 चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटवर चाहत्यांच्या बारीक नजरा आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे आणि तो व्हिडीओ टायगर 3 चित्रपटाच्या सेटवरील असल्याचा दावा देखील केला जातोय. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये इमरान हाश्मी देखील दिसतोय. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
#EmraanHashmi Stills From The #Tiger3
Badass Villion Vibee ??#SalmanKhan? #KatrinaKaif pic.twitter.com/8fem1Ui4Hk
— A J A Y S.M. (@BeingAjayJain) February 24, 2023
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये इमरान हाश्मासोबत एक महिला दिसत आहे, ती कतरिना असल्याचा दावा केला जातोय. सलमान खान आणि कतरिना कैफ यांना स्क्रीन शेअर करताना पाहण्यास चाहते इच्छुक आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये इमरान हाश्मी याचा खास लूक दिसतोय.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, चित्रपटामधील महत्वाच्या सीनचे शूटिंग सुरू आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह बघायला मिळतोय. या व्हिडीओ चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
सलमान खान याचा चित्रपट किसी का भाई किसी की जान याच्यामधील बिल्ली बिल्ली हे गाणे आज रिलीज झाले आहे. यापूर्वी चित्रपटातील एक गाणे रिलीज करण्यात आले होते. विशेष म्हणजे चित्रपटातील गाण्यांना चाहत्यांचे मोठे प्रेम मिळताना दिसत आहे. हे गाणे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.