Video | ‘तलाक’च्या घोषणेनंतरही आमिर-किरण एकमेकांच्या जवळ, लडाखमध्ये पारंपरिक वेशात धरला ठेका!
काही दिवसांपूर्वी घटस्फोटाची बातमी जाहीर करत बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) यांनी चाहत्यांना धक्का दिला होता. लग्नाच्या 15 वर्षानंतर दोघेही विभक्त होणार आहेत.
मुंबई : काही दिवसांपूर्वी घटस्फोटाची बातमी जाहीर करत बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) यांनी चाहत्यांना धक्का दिला होता. लग्नाच्या 15 वर्षानंतर दोघेही विभक्त होणार आहेत. तथापि, ते असेही म्हणाले की, ज्या काही प्रोजेक्टवर ते दोघे काम करत आहेत त्यावर ते एकत्र काम करतील, इतर गोष्टीही एकत्र सांभाळतील. आजकाल आमिर आणि किरण लडाखमध्ये ‘लाल सिंह चड्डा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाच्या शूटिंगसाठी पोहोचले आहेत. शूटमधून ब्रेक घेत आमिर आणि किरण तेथील लोकांसोबत बरीच धमाल करत आहेत. आमिर आणि किरण तेथे पारंपारिक आऊटफिट परिधान करुन त्यांच्यासोबत नाचत आहेत.
या दरम्यान, आमिरने जांभळ्या रंगाच्या टोपीसह लाल रंगाचा पोशाख परिधान केला आहे, तर किरणने हिरव्या रंगाच्या टोपीसह गडद गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. एक स्थानिक स्त्री त्यांना नृत्य शिकवत आहे आणि आमिर, किरण तिला पाहून नृत्य करत आहेत. हे दोघेही नाचू लागताच प्रत्येकजण आनंदाने ओरडायला लागतो. वास्तविक, लडाखमधील एका गावात तेथील स्थानिक लोकांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे स्वागत केले आणि यादरम्यान प्रत्येकाने खूप धमाल केली.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
आमिर खानचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो काही लहान मुलांसह नाचताना दिसत आहे. हे व्हिडीओ पाहून आमिर, किरण आणि चित्रपटाची संपूर्ण टीम तिथे शूटिंग करत असताना खूप धमाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
पहिला फोटोही चर्चेत!
Grateful #Bala #LaalSinghChaddha pic.twitter.com/hLidCDCcyf
— chaitanya akkineni (@chay_akkineni) July 9, 2021
या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यापूर्वी चैतन्य अक्कीनेनीने आमिर आणि किरणबरोबर एक फोटो शेअर केला होता. या दरम्यान, आमिरने चैतन्य आणि किरणला मिठी मारली होती. तसे, आमिर आणि किरण दोघेही खूप प्रोफेशनल आहेत आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनातील निर्णय त्यांच्या व्यावसायिक जीवनात अटकळ होऊ देत नाहीत.
घटस्फोटावर काय म्हणाला आमिर?
आमिरने घटस्फोटाबद्दल आपले मत केले होते आणि लिहिले होते की, ‘15 वर्षांच्या सुंदर प्रवासात आम्ही बर्याच चांगल्या क्षणांचा आनंद लुटला आणि आमच्या नात्यातील विश्वास, प्रेम आणि आदर वाढला आहे. आता आम्ही आमच्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करणार आहोत, परंतु पती-पत्नी म्हणून नव्हे तर सह-पालक म्हणून… आम्ही काही काळापूर्वी आपापले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला होता आणि आता ते सर्वांसह शेअर करत आहोत. आम्ही मुलगा आझाद याचे एकत्र संगोपन करू.’
व्यावसायिक जीवनात एकत्र
आमच्याकडे असलेले सर्व चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर सर्व प्रकल्प आम्ही एकत्रितपणे पूर्ण करु. आम्ही हा घटस्फोट शेवटाच्या रूपात पाहत नाही, तर एका नवीन प्रवासाची सुरूवात म्हणून पाहत आहोत.
(Aamir Khan And Kiran Rao enjoying in ladakh while shooting for Laal Singh Chaddha)