आयरा खानला कशाची सतावतेय भीती? लग्नाच्या 6 महिन्यांनंतर लिहिली पोस्ट

अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा खानने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये आयराने तिच्या मनातील एक भीती बोलून दाखवली आहे. आमिरची आई आणि आयराच्या आजीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे हे फोटो आहेत.

आयरा खानला कशाची सतावतेय भीती? लग्नाच्या 6 महिन्यांनंतर लिहिली पोस्ट
ira khan Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 4:12 PM

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने यावर्षी जानेवारी महिन्यात बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी लग्न केलं. हा लग्नसोहळा संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत चर्चेत होता. या दोघांच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाली आहेत. आयरा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून तिच्या आयुष्यातील विविध गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने एका बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. आयराची आजी म्हणजेच आमिरच्या आईचा 90 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट करत आयराने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये आयराने तिच्या मनातील एक भितीसुद्धा बोलून दाखवली आहे.

आयरा खानची पोस्ट-

‘मला माहित आहे की या फोटोमध्ये बऱ्याच गोष्टी आणि बरीच लोकं आहेत. पण तुम्ही फक्त आजीच्या चेहऱ्यावर लक्ष केंद्रीत करावं अशी माझी इच्छा आहे. फक्त तिलाच पहा. केक कापायचा समारंभ पंधरा मिनिटांत उरकला. कारण जास्त वेळ उभं राहणं तिच्यासाठी दमछाक करणारं ठरू शकतं. जसजसं वय वाढतं, तसे शरीरात अनेक बदल होतात. त्यासोबतच एक भीती, अशक्तपणा असतो,’ असं तिने लिहिलंय.

या पोस्टमध्ये आयराने पुढे तिचे विचार मांडले आहेत. ‘वृद्धापकाळाकडे वळणं कसं असतं, याविषयीचे विचार अधूनमधून माझ्या डोक्यात येतात. तुमचे केस पांढरं होणारं वृद्धत्व नाही तर तुमच्या शरीरात पूर्वीसारखी ऊर्जा, तेज न राहण्याचं वृद्धत्व. जिथे आपण आपल्या सर्वच गोष्टींमधील क्षमता गमावू लागतो. मला नेहमी हा प्रश्न पडतो की तेव्हासुद्धा मी माझ्या आयुष्याचा आनंद घेऊ शकेन का? किंवा तोपर्यंत मी फक्त हालचालीच करू शकेन. पण तिच्या हास्याकडे पहा. या सगळ्यांतून ती चमकत होती. तीच खरी चमक आहे. ते पाहून माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.

आयराने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये आमिर खानचं संपूर्ण कुटुंब पहायला मिळतंय. आमिरच्या दोन्ही पूर्व पत्नीसुद्धा फ्रेममध्ये दिसत आहेत. रिना दत्ता आणि तिची मुलं, त्याचसोबत किरण राव आणि तिचा मुलगासुद्धा या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. घटस्फोट झाला तरी आमिरचं त्याच्या दोन्ही पूर्व पत्नींसोबत मैत्रीपूर्ण नातं आहे. आयरा ही आमिर आणि रिना दत्ता यांची मुलगी आहे.

शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळंचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळंचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले.
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू.
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'.
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.