Aamir Khan Kiran Rao Divorce : आमिर-किरणचा घटस्फोट फातिमा शेखमुळे?, दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा

आमिर आणि फातिमा यांनी दंगल आणि ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. (Aamir Khan Kiran Rao Divorce: Aamir-Kiran Divorce Due To Fatima Shaikh ?, Discussion About Their Relationship)

Aamir Khan Kiran Rao Divorce : आमिर-किरणचा घटस्फोट फातिमा शेखमुळे?, दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 10:51 AM

मुंबई : आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) यांनी लग्नाच्या 15 वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही एक निवेदन जारी करुन चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. मात्र लव्ह मॅरेज करून एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं ठरवल्यानंतर अचानक हा निर्णय का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित होतोय. दोघांच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावरील चाहते संमिश्र प्रतिसाद देत आहेत. काहीजण आमिर आणि किरणच्या या निर्णयाचा आदर करत आहेत तर काही जण आमिरला ट्रोल करत आहेत.

नेटकऱ्यांकडून फातिमा ट्रोल

अशात आता अभिनेत्री फातिमा सना शेख विषयी चर्चा सुरु झाली आहे. फातिमाच आमिर आणि किरणच्या घटस्फोटाचं कारण आहे अशी चर्चा आहे. नेटकऱ्यांकडून फातिमाला ट्रोल करण्यात येत आहे. आमिर आणि फातिमा यांनी दंगल आणि ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. फातिमा यांनी दंगलच्या माध्यमातून मुख्य भूमिकेत तिच्या करियरची सुरुवात केली.

फातिमानं बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. चाची 420 मधील कमल हसनच्या मुलीच्या भूमिकेतून तिला बरीच प्रसिद्धी मिळाली. त्याचबरोबर तिनं शाहरुख खानबरोबर वन टू का फोरमध्ये काम केले आहे. ती लेडीज स्पेशल आणि अगले जनम मोहे बिटिया ही किजो सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.

फातिमाचे चित्रपट

फातिमा मागच्या वर्षी 2020 मध्ये लुडो आणि सूरज पे मंगल भारीमध्ये दिसली होती. लुडोमध्ये ती राजकुमार राव यांच्या सोबत दिसली होती. अनुराग बसू दिग्दर्शित या चित्रपटात फातिमा व्यतिरिक्त राजकुमार, अभिषेक बच्चन, आदित्य रॉय कपूर, सान्या मल्होत्रा, पंकज त्रिपाठी आणि रोहित सुरेश सर्राफ मुख्य भूमिकेत होते.

दुसरीकडे सूरज पे मंगल भारीमध्ये फातिमा आणि दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत होते. काही दिवसांपूर्वी फातिमा देखील आजीद दास्तानमध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिला आपलं काम आवडलं होतं. आता ती अनिल कपूरसोबत एक चित्रपट करत आहे. दोघांनी सोशल मीडियावर शूटिंग दरम्यान बरेच फोटो शेअर केले होते.

सान्या मल्होत्राशी संबंध असल्याच्या बातम्या

फातिमा आणि सान्याच्या रिलेशनशिपच्या बातम्याही आल्या होत्या, ज्या ऐकून चाहत्यांना धक्का बसला. याबद्दल फातिमा म्हणाली होती, ‘जेव्हा आम्ही ही बातमी ऐकली तेव्हा आम्ही दोघं खूप हसलो. आम्ही चांगले मित्र आहोत आणि एकत्र हँगआऊट करणं याचा अर्थ असा नाही की आपण रिलेशनशिपमध्ये आहोत. बरं, मी सान्याकडून बरंच काही शिकले आहे.

संबंधित बातम्या 

Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची उत्सुकता, ‘या’ कलाकारांच्या नावांची चर्चा

Photo : फातिमा सना शेखमुळे आमिर-किरणचा घटस्फोट !, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.